पान:गद्यरत्नमाला.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इतिहास.

१०१


साचें ज्ञान असणे आवश्यक आहे. पहा, मनुष्य जन्मास येतांच त्यास अरण्यांत नेऊन सोडलें आणि फक्त त्याच्या उपजीवनाचे मात्र उपाय योजिले तर तो पशु होईल किंवा मनुष्य होईल ? मनुष्याचा शब्दहि त्याच्या कानी पडला नाहीं तर त्यास मनुष्य- वाणीसुद्धां फुटणार नाहीं. मग तो पशूच राहील यांत काय सं- शय ? यावरून सिद्ध होतें कीं, ईश्वरानें मनुष्यास बुद्धि दिली आहे, परंतु सर्व शहाणपण त्याच्या अंगीं स्वभावतःच उत्पन्न व्हावें असें न करितां त्यानें सर्व गोष्टी अनुकरणानेंच शिकाव्या अशी तजवीज त्यानें केली आहे, असें दिसतें. असें आहे तर मनुष्यास अनुकरण करण्यास जितक्या गोष्टी चांगल्या व अधिक असतील तितक्या चांगल्याच उत्तरोत्तर जगांत अधिक सुधारणा होत चालली आहे. नवीन नवीन कल्पना निघत आहेत, हैं एक अनुकरणानें मनुष्य शहाणा होतो यास मोठें प्रमाण होय.
 कित्येक अविचारी अज्ञान लोक मागल्या लोकांस हंसतात; पण त्यांनीं हें पक्के लक्षांत ठेविले पाहिजे, कीं आपण मागल्या लोकांस हंसतो त्याप्रमाणेच पुढील प्रजा आपणांस हंसणार आहे. वास्तविक पाहतां कोणी कोणास हंसणें ठीक नाहीं. मागील लोकांच्या अनुभवाच्या मानानें जे शहाणे होते, त्यांजपेक्षां हल्लीं अनुभव जास्त आहे म्हणून अधिक सुधारणा झाली. यावरून होईल तितका आपल्या व पुढल्या प्रजेच्या उपयोगाकरतां इति- हाससंग्रह करणें हें प्रत्येक मनुष्याचें कर्तव्यच आहे. प्राचीन काळीं लोक इतिहास लिहीत नसत. यास दोन तीन कारणें दिसतात. देशांचे परस्परांश दळणवळण नसल्यामुळे इतर देशांच्या गोष्टी समजण्याचा प्रसंग येत नसे. तसेंच स्वदेशाचाहि स्मरणांत न राहण्यासारखा फार वृत्तांत नसे. त्यामुळें कोणी इ. तिहास लिहिण्याची पर्वा करीत नसे. शिवाय सर्व देशांत लेख. नकलाहि पूर्णपणे माहित नसे. त्यामुळे इतिहासास कर्धी महत्व