पान:गच्चीवरील गप्पा.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गच्चीवरील गप्पा.

मग त्याच्यापेक्षां पुरुषांनाच दुप्पट पगार कां देऊं नये ? आपले घर सोडून बायकोला दिवसभर बाहेर काम करावयाला लावणें ही कोणत्या जातीची संस्कृति ? पुरुष बेकार म्हणून उपाशी मरतात आणि स्त्रियांना काम मिळतें, असा विलक्षण देखावा सध्यां दिसत आहे. कोणत्याहि कामाला पुरुष बेसुमार मिळत असतां स्त्रियांनीं तीं कामें करण्यास पुढें येण्याचें वस्तुतः कारणच नाहीं. पण अशा अस्वाभाविक कृत्यांनीच बेका-- रीचा प्रश्न उत्पन्न झाला आहे. पुरुषांनी करावयाच्या कामांत स्त्रियांचा प्रवेश जर असाच चालू राहील तर बेकारीचा प्रश्न कधीच सुटणार नाहीं. स्त्रियांना सरकारी, निमसरकारी वा कंपनीची नोकरी मिळतां कामा नये, अशा धर्तीचा कायदा केला तरी समाजाचें अनहित न होतां कल्याणच होईल. घर संभाळून घरांतल्या घरांत स्त्रियांना करतां येतील असे शेकडों धंदे आहेत. स्वतंत्र धंदे करण्याचा उद्देशच मुळी असा की, पुरुषांवर आपणांस अवलंबून राहणे भाग पडूं नये. जगांत स्त्रीसाम्राज्य स्थापावें असें त्यांस वाटतें. सर्व आपत्तीचें मूळ ह्यांतच आहे. स्त्रियांना शिक्षण नको असें कोणीच म्हणत नाहीं. पण ज्या शिक्षणाच्या योगानें त्यांना घरांतून बाहेर पाय काढावा लागेल अशा प्रकारचें शिक्षण नको इतकेंच. बौद्धिक शिक्षण बरेंच पोट भरण्याकरितां असतें. तें स्त्रियांना देऊन तरी काय करावयाचें ? एकादी स्त्री उत्तम वकील होण्या- सारखी असली, निसर्गाची देणगी तिला तशा प्रकारची असली आणि असे असून सुद्धां समाज तिला वकील होऊं देत नाहीं, तरी त्यांत विघ- डलें कोठें ? जगाचें तिच्या वकिलीवांचून एवढें कोठें अडून राहणार. आहे ? तें काम करण्यास पुरुषांची गर्दी काय कमी आहे ? म्हणून स्त्रियांच्या बुद्धीचा भरपूर उपयोग समाजानें करून घेण्याचें नाकारिलें तरी त्यांत सामुदायिक नुकसान काडीचेहि नाही. स्त्रियांच्या बुद्धीचा होत आहे ही काटी असमंजसपणाची आहे. सुमाता व सुगृहिणी कर

५८