पान:गंगाजल (Gangajal).pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६६ / गंगाजल स्पष्ट असतात. काही अवस्थांमध्ये त्या बऱ्याच अस्पष्ट होतात. एका समाजाचा परकीय समाजाशी कोणत्याही त-हेने निकट संबंध आला, म्हणजे आचारविचारभिन्नतेची तीव्र जाणीव होऊन ह्या मर्यादा पुसट व्हायला लागतात. उदाहरणेच द्यावयाची, तर आपल्या स्वत:च्या समाजातील देता येतील. “जाईन उभ्या बिदी। न दिसे उजवी बूज। राखील कुळ तुझं.' ह्या ओवीत मर्यादशील स्त्रीने पदर कसा घ्यावा, हे सूचित केले आहे. आजकाल कित्येक कुलवानांच्या मुली व वधू ह्यांचा पदर मुळी एकाच खांद्यावर असतो. तेव्हा ही मर्यादा बदलण्याचे कारण ज्या समाजात स्त्रिया दोन्ही खाद उघडे टाकितात अशा समाजाशी संबंध आला, हेच आहे. पूर्वीच्या काळी लग्नाच्या दोन बायका असणे हे अप्रतिष्ठेचे लक्षण नव्हते. आता ती गोष्ट गुन्ह्याच्या सदरात जाऊन बसली आहे. हाही परिणाम संस्कृतिसंगमाचाच आहे. प्रत्येक समाजामध्ये आचाराचे जे नियम असतात, ते सर्वच्या सर्वच अगदी निरपवाद नसतात. काही प्रसंगी ते नियम सैल होतात, किंवा काही वेळेपुरते अजिबात नाहीतसे होतात. उदा.- होळीच्या दिवसांत गोवरा लाकडाची चोरी करणे पूर्वी क्षम्य मानिले जाई. तसेच, एरव्ही सभ्य वागण लोक त्या दिवसांत मन मानेल तसा गलिच्छपणा व शिवीगाळही करा असत. काही प्रसंगी एरव्ही कानाला न रुचणारा विनोद आणि थट्टा क्ष समजली जाई. बहतेक सर्व समाजांतून सर्वसाधारणपणे न खपणारे वत' काही विशिष्ट प्रसंगी करण्याची मुभा असे, आणि ही मभाही सर्वांना नसू काही विशिष्ट वयाच्या व त-हेच्या व्यक्तींना असे. हिंदू समाजातील शिम किंवा ख्रिस्ती समाजातील कार्निव्हल हे अशा प्रकारची बंधने शिा करावयाचे सण आहेत. ही बंधनांची शिथिलतासुद्धा काही तरी निया बसलेली असते. ज्या वेळी कुठच्याच त-हेचे नियम राहत नाहीत, कु. योग्य, कुठचे अयोग्य, कुठचे कर्म, कुठचे अकर्म हे समाजातील बहुस व्यक्तींना कळेनासे होते, तेव्हा व्यक्तींच्या जीवनात भयंकर क्रांती होत. तन्हांची जीवनमूल्ये विस्कटून गेली आहेत, कशाला प्रमाण म्हणून । नाही, अशा अवस्थेत समाज किंवा व्यक्ती दोन्ही जगू शकत नाहीत. प्रमाणे नष्ट होऊन नवीन प्रमाणे सर्वमान्य होईपर्यंत जो वेळ जाता, व्यक्तीला किंवा समाजाला अतिशय कष्टाचा असतो. ह्याच अनुषंगाने वाङमय, कला व संप्रदाय ह्यांचा विचार । गती होते. सर्व म्हणून राहिले छ जातो, तो