पान:गंगाजल (Gangajal).pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सात : ' व्यक्तिस्वातंत्र्य आणि बंधमुक्तता "अश्लीलता हा कोणत्याही लेखाचा, चित्राचा किंवा इतर वस्तूचा गुण नसून तो फक्त तसा आरोप करणारांच्या मेंदूचा गुण होय," हे वाक्य कै. स्पुनाथ धोडो कर्वे आपल्या 'समाजस्वास्थ्य' मासिकाच्या पहिल्या पृष्ठावर ०ळकपणे छापीत असत. त्यांचा उद्देश असा दिसतो की, हिरवा, पिवळा, बडा, लांब-रुंद, उंच-ठेंगणा, कडू-आंबट-गोड वगैरे गुण वस्तुनिष्ठ असतात, त्याप्रमाणे अश्लीलता हा गुण नसून तो केवळ अनुभवणाऱ्या मनाचा विकार आहे. त्यांना असे म्हणावयाचे आहे की, अमकी एक कृती अश्लील आहे असे जो म्हणतो, त्याचे मनच अश्लील आहे. ह्या म्हणण्यात एका दृष्टीने तथ्य नाही, आणि एका दृष्टीने आहे- कोणत्याही गोष्टीच्या गुणधर्मांचा विचार करताना अगदी पूर्णतया शास्त्रीय दृष्टीने विचार केला तर परिणाम कदाचित वस्तूचाच गुण म्हणून म्हणता येईल. पण रंग, चव वगैरे अगदी वस्तुनिष्ठ भासणारे गुणसद्धा वस्तुनिष्ठ नसून व्यक्तिनिष्ठ असतात. पान व्यक्ती ज्या जीवनकोटीतील असते, त्या कोटीच्या शरीररचनेवर व मदूच्या ग्रहणशक्तीवर ते अवलंबन असतात. माझ्या बागेतील अमक्या-एका कुलाचा रंग तांबडा आहे असे जेव्हा मी म्हणते. तेव्हा त्याचा अर्थ इतकाच ', त्या फुलावरून परावर्तित होणाऱ्या काही लांबीच्या प्रकाशलहरी माझ्या (मनुष्याच्या) डोळ्यांना तांबड्या भासतात. पण त्याच वेळी त्याच बागेत धमाशीला तेच फूल मुळीच तांबडे दिसणार नाही. ही वस्तुनिष्ठ समजल्या जाणाऱ्या गुणांची गोष्ट. इतर गुण तर तक अशी व्यक्तिनिष्ठ किंवा समाजनिष्ठच असतात. चांगले-वाईट, सुदर भमा