पान:गंगाजल (Gangajal).pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२ | गंगाजल आपल्या मनात उसळी मारून उठतात. कालिदास म्हणतो, जन्मांतरांचे संस्कार भावस्थिर' असतात, व एखादे वेळी डिवचले जाऊन उठतात. हे संस्कार माझ्या पूर्वजन्मीचे होते की आजची मी माझ्या सर्व पूर्वजांचे संस्कार घेऊन जन्माला आले होते, कोण जाणे! एवढे मात्र खचित की, त्या रात्री कित्येक लाखांपासून काही शतकांपूर्वीच्या माझ्या पूर्वजांबरोबर मी पृथ्वी पालथी घातली होती. रात्रीच्या काही तासांत मी यगे जगले होते. वेळेचा अशी गल्लत होते कशी? काळ वा वेळ हा एक अनुभव आहे. तो काय घड्याळाच्या काट्यात बसविता येणार आहे? का घड्याळाच्या काट्यानी मोजता येणार आहे? १९७०