पान:गंगाजल (Gangajal).pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२० । गंगाजल कॉलेजातील विद्यार्थी व अप्पांचे मित्र ह्यांपर्यंत सगळ्यांनाच, त्या हव्याहव्याशा वाटत. ही सगळीच चाहते -मंडळी अप्पांच्या आवडीची नसत. मला वाटते, मी जी अप्पांच्या घरी घुसले, तीसुद्धा थोडीशी त्यांच्या मनाविरुद्धच. माझे त्यांच्या घरात येणे सईताईंखेरीज इतर कुणाला फारसे रुचले असेल, असे वाटत नाही. त्यामुळे मीही कित्येक महिने सईताईंच्याच भोवतीभोवती असे. पहिले काही दिवस तर मला असा अनुभव आला की, त्यामुळे घरातल्या इतर वडील माणसांपासून शक्य तितके लांबच राहण्याचा मी प्रयत्न करू लागले. ___ज्याच्याशी मनात नसताना पदोपदी संबंध येई व मनस्ताप होई, असे एक मनुष्य म्हणजे वहिनी- सईताईंच्या आई. ह्या बाई एक अपत्य झाल्याबरोबर विधवा झालेल्या होत्या. त्या पुण्यात-गावात राहत असत. पण सईताईंचे लग्न झाल्यावर काही वर्षांनी सईताई आजारी पडल्यामुळे त्या लेकीच्या घरी रहायला म्हणून ज्या आल्या, त्या मरेपर्यंत तेथेच राहिल्या. संसार करायच्या दिवसांतच विधवा होऊन बोर्डिंगमध्ये राहिल्यामुळे त्यांची संसाराची सर्वच आशा अपरी राहिलेली होती. अचानकपणे त्या लेकीच्या संसारात आल्या होत्या आणि तो त्यांनी अतिशय नेकीने, काटकसरीन, पैशाच्या दृष्टीने अप्पांचे हित बघून केला. पण त्यांची काटकसर, रूक्षपणा, क्षुद्रपणे लोकांना घालून-पाडून बोलायची सवय ह्यांचा घरात सर्वांनाच त्रास होई. तरीही पहिल्याने अपरिहार्य म्हणून व मागून कर्तव्यबुद्धीने अप्पाना हा बाईंचा सासुरवास आपल्या स्वत:च्या घरात सहन केला. ह्या बाई काहा वेळेला सकारण, पण बऱ्याचदा निष्कारण मला रागावत व माझा दुःस्वार करीत आणि त्यामुळे होता-होईतो त्यांचा संबंध टाळायचा, अशी माशा प्रवृत्ती असे. विलक्षण गोष्ट म्हणजे अप्पांच्याबद्दलही मला अतिशय भीती वाट असे. अप्पा कधीही मला अपमानकारक बोलल्याचे किंवा जार रागावल्याचेसुद्धा आठवत नाही. तरी पण त्यांचा मोठा आवाज, आकड मिशा, गडगडाटी हसणे, उंच व भव्य देह ह्यांच्यामुळे की काय, मला त्य भयंकर भीती वाटत असे, हे मात्र खरे. इतरही लहान-लहान कारण वाटायला होती. एक म्हणजे मला गणित बिलकुल येत नसे; आणि कधीकधी आम्हा मुलांना तोंडचे हिशेब घालीत व उत्तरे विचारीत. वेळी अंग चोरून मी कितीही लहान व्हायचा प्रयत्न केला, तरी त्य , मला त्यांची हान कारणे भीती प्पा विचारीत. अशा कला, तरी त्यांच्या