Jump to content

पान:खानदेश मित्र.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
त्वरा करा !
खानदेशमित्र.

अवश्य घ्या !!

( मासिक पुस्तक).

 हें मा० पु० मार्च १८९ २३० पासून सुरू झाले असून हा आजचा त्याचा प्रथमांक आहे. या पुस्तकांत नाटकें, कादंबऱ्या चातुर्याच्या गोष्टी, अद्भुत कथा, मनोरंजक कविता, शूरपुरुषांची व देवादिकांची चरित्रे स्थलवर्णन, विनोदपर चुटके, लोकोत्तर चमत्कार, कधीही छापून प्रसिद्ध झाले नाहीत अशा पुराण ग्रंथां- तील क्रमश: गद्यरूपानें सार, निवडक देशी औषधें, ठिकठिकाणचे नवल विशेष वर्तमान, सुबोधवचनसार संग्रह, ऐतिहासिक माहिती पुस्तकावरील अभिप्राय इ० इ० अनेक विषय येत जातील; त्याच- प्रमाणे कोण हरएक प्रकारच्या उपयुक्त विषयांवरील लेख, पत्र- व्यवहार, ( ह्यांत एक व्यक्तीस अनुलक्षन निंदा किंवा स्तुति के- ली असता कामा नये. ) कूरें, सुभाषितें पाठविल्यास त्यांचाही समावेश केला जाईल. ( कूटें व सुभाषितें ही पूर्वी कधीही छ. पून प्रसिद्ध झालेली नाहीत. अशीच असावीत ) आजला जरी ह्मा मा० पु० २४ पृष्ठे दिली आहेत तरी एक तिमाही- च्या आंतच जर ५०० वर वर्गणीदार मिळाले तर ती लागलीच ३६ पावेतों करूं ! सारे होणे जाणे आश्रयदात्यांच्या मजवर अ वलंबून आहे. करितां महाराष्ट्र भाषाभिज्ञ प्रत्येक कटुंब प्रमुख मनु- यांनी या गोष्टीकडे अवश्य लक्ष्य पुरवून त्यास देतां येईल तित का उदार आश्रय द्यावा व ते तसें करितील अशी मला पूर्ण आशा आहे.
 विशेष सूचना -- हा प्रथमांक आह्मी नमुन्यादाखल स्वतः च्या खर्चाने पोष्टमार्फत पुष्कळ सूज्ञ व वाचनप्रिय सद्गहस्थांकडे पाठविला आहे. परंतु पुढील अंक, वर्गणी ट० हा० सह आगा- ऊ आल्यावांचून कोणांसही पाठवितां येण्याची सवड नाही. त्या- स्तव ज्यांस है मा० पु० सुरू ठेवणे असेल त्यांनी अंक पावल्या दिवसा पासून १५ दिवसांचे आंत वर्गणी मेहेरबानीनें पाठवून द्या- वी. किंवा घेणें नसल्यास अंक ८ दिवसांचे आंत परत करावा. दोन्ही तजवेजीतून एकही जे करणार नाहीत त्यांजकडे आमचे ते कायमचे वर्गणीदार असे समजून दुसरा अंक व्या० पे० नें (१४५)

पाठविला जाईल.

डि० ही ० पुराणीक.