Jump to content

पान:खानदेश मित्र.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सुगृहिणी स्वकर्तव्य.

करावी आणि भक्तियुक्त अंतःकरणेंकरून तें पादतीर्थं प्राशन करावें व मनांत पति हा प्रत्यक्ष शंकरच आहे असा भाव धरावा आणि सदैव त्याचे सेवेविषयीं उल्हासयुक्त असावें. ८ पति ज्या दिवशीं घरीं असेल त्या दिवशी शृंगारादीक करावे नसल्यास वर्ज. ९ प्रसंगविशेषीं पति जरी क्रोधयुक्त होत्साता मर्मभेदक भाषण करूं लागला तरी त्या वेळीं त्यास उलट उत्तर न देतां आनंदांत असल्या वेळी प्रार्थनेनें आप- ला जो योग्य उद्देश असेल तो त्यास कळवावा. १० पति बाहेरून घरी येताक्षणीच हातचें काम टाकून तो जी आज्ञा करील ती मान्य करावी आणि जेणें- करून त्याचा आत्मा त्वरित शांत होईल अशी व्यवस्था करावी. १९ ज्या दिवशीं पतिराज घरों नसेल त्या दिवशीं अतिथिप्रसाद घ्यावा; किंवा गोमातेस अन्न चालून नंतर भोजन करावें; कारण गोमाता ही देवादिकापेक्षांही श्रेष्ठ आहे.

श्लोक.

पृष्ठे ब्रह्मा गलेविष्णुर्मुखे रुद्रप्रतिष्ठितः ।।
मध्येदेवगणाः सर्वे रोमकूपे महर्षयः ॥ १ ॥
नागाः पुच्छे खुराग्रेषु येचाष्टौ कुलपर्वताः ॥
सूत्रे गंगादयो नद्यः नेत्रयोः शशिभास्करौ ॥ २ ॥

१२ स्वगृह स्वसामर्थ्यानुरूप नेहमीं निर्मळ राखावे. १३ काँहीं नवीन व्रतोपोषण करणें झाल्यास पतीची आज्ञा असल्यावांचून करूं नये. १४ लोक