पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/124

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

फे-यांतून पिढ्या मुक्त होऊ शकतात. हे पक्क ज्ञात असलेल्या लीलाताईंचा मूळ पिंड संशोधकाचा. रोज नवं शोधायचं हा शोध आशय, मांडणी, स्पष्टीकरण साच्या अंगांनी घेत सुबोध पद्धतीनं मुलांपर्यंत पोचवायचा. डोक्यात भरायचा नाही. स्वीकारायचं नि नाकारायचं स्वातंत्र्य आपल्या विद्यार्थ्यांस समजावणाच्या लीलाताई म्हणून तर नवी वाट नव्याने ओलांडतात. त्यामुळे सृजनाचं शिक्षण शिळी भाजी आणि शिंपडून ताजी केल्याचा बनाव न होता ती एक रसरशीत जिवंत संवादाचं, चर्चेचं साधन बनते. ऐकणं, लिहिणं, पहाणं या पलीकडे जाऊन ते 'अनुभव' होतं हे महत्त्वाचं. हा अनुभव आश्वासक असतो. तो स्वतःहून पाहिलेला स्वर्ग असतो. सर्वसाधारण शिक्षण ‘बबई का समुंदर देखो, आगरा का ताजमहाल देखो' असा प्रेक्षणीय खेळ ठरत असता सृजनचं शिक्षण समुद्र खारट का झाला हे समजावतं, ताजमहालाचं सौंदर्य सांगताना त्याच्या निर्मिती आणि क्रौर्यही विद्याथ्र्यांपर्यंत पोहोचवतं म्हणून ते अधिक प्रभावी, परिणामी असतं. पाहणं आणि अनुभवण्यातील दरी सांधणारं लीलाताईंचं शिक्षण अधिक सापेक्ष नि साक्षेपी ठरतं. एक तरी ओवी अनुभवावी' या न्यायानं त्या आपल्या शाळेत विद्याथ्र्यांना प्रयोग दाखवत नाहीत. ते करायला लावतात. विज्ञान शिक्षक मला शाळेत असताना जादूगार वाटायचे. लीलाताई मुलांच्या किमयागार होतात, ते त्यांच्या अध्यापनाच्या आगळेपणानं. तुम्ही वेगळे करता ही सामान्य गोष्ट असते. तुम्ही वेगळेपणानं करू शकता का, हे लक्षणीय । असतं. जडत्व दूर सारणं, चैतन्याचे झरे वाहते करणं, मन फिरतं ठेवणं, ते भिरभिरू देणं म्हणजे शिक्षण. आपणास छापाचे गणपती बनवायचे होते म्हणून आपण सार्वत्रिक शिक्षण समान ठेवलं. शिक्षकांचे सैनिकीकरण केलं. त्यांच्या 'फँटसी'ला जेरबंद केलं. म्हणून आपल्या शिक्षणात Action Research ला अवकाश लाभला नाही.

 शिक्षणाचं पण आपलं असं पर्यावरण असतं. ते बनवायला लागतं. नुसत्या भिंती बोलत्या झाल्या, तक्ते लटकले की झालं पर्यावरण असं असत नाही. मुलांनी बनवलेले तक्ते शिक्षणाच्या सर्जनशीलतेची खरी अभिव्यक्ती! मुलांनी काढलेले सूर्य (भले किरण नसो त्यात!) पण ते मुलांचं म्हणून महत्त्वाचं. इतकं छोटं भानही आपण इतक्या वर्षांत निर्माण करू शकलो नाही. मुलांचा सूर्य मुलांनीच दुरुस्त करण्याचा लीलाताईंचाआग्रह बघितला की त्यांचं शिक्षण केवळ ‘बालकेंद्री' न राहता ते ‘बाल्यकेंद्री' कसं असतं याची प्रचिती येते. शिक्षणाला भांडवली गुंतवणूक ठरवणाच्या शासन, समाज व पालकांनी शिक्षणाचं पर्यावरण कधी मुळापासून समजूनच न

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१२३