Jump to content

पान:केसरीवरील खटला.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रस्तावना

 केसरीवरील खटल्याच्या समग्र इंग्रजी हकीगतीचें पुस्तक आम्हीं नुकतेंच प्रसिद्ध केले आहे. परंतु मराठी वाचकांचे सोईकरितां म्हणून या खटल्याची समग्र हकीगत पुस्तकरूपानें एकत्र वाचावयास मिळा- ल्यास बरें, अशा सूचना बऱ्याच लोकांकडून आम्हांस आल्यावरून आम्ही हे पुस्तक छापून प्रसिद्ध करीत आहों. यांत लघुलेखकांकडून लिहून घेतलेली खटल्याची समग्र हकीगत असून शिवाय वर्तमान- पत्रांची मतें वगैरे मजकूरहि पुरवणीदाखल जोडण्यांत आला आहे.

पुणे, ता, ३१ ऑगस्ट }

प्रकाशक