टिळकांचें राष्ट्रीय अर्थशास्त्र । २८९
तशीच आज (१९०२ साली) या स्वेटेड इंडस्ट्रीजमध्ये (स्लॉपक्थॉय्, लो ग्रेड फर्निचर इत्यादि) आहे." खाणींमध्ये स्त्रियांच्या कमरेला हातगाड्यांचे दोर बांधून त्यांना दोन हात टेकून चक्क बैलांप्रमाणे त्या गाड्या ओढायला लावीत. 'सोशल हिस्टरी ऑफ इंग्लंड' या ग्रंथांत याचीं चित्रेच दिली आहेत.
स्वतःच्या देशांतील व स्वतःच्या रक्ताच्या गोऱ्या कामगारांचा असा अमानुष छळ करणारे ब्रिटिश सत्ताधीश हिंदी कामगारांसाठी कायदे करण्यास दयाबुद्धीने प्रेरित झाले होते असें म्हणणें सैतानालाच फक्त शक्य आहे. ब्रिटनमध्ये कामगार संघटनांमुळे पूर्वीप्रमाणे कामगारांचा रक्तशोष करतां येईना. तेव्हा हिंदुस्थानांत भांडवल गुंतवून तेथल्या कामगारांचें रक्त प्यावें हाच ब्रिटिश भांडवलदारांचा हेतु होता. आसामच्या चहाच्या मळ्यांत व चंपारण्यांतील निळीच्या मळ्यांत ते हा रक्तशोष करीतच होते. तेव्हा येथे कारखाने काढून येथल्या कामगारांचा त्यांनी हिंदी कारखानदारांपेक्षा दसपट रक्तशोष केला असता यांत शंकाच नाही.
तेव्हा ब्रिटिशांच्या या आर्थिक आक्रमणास स्वदेशी- बहिष्कारादि चळवळींनी विरोध करणें, व हिंदी उद्योगधंदे बुडविण्यासाठी त्यांनी केलेले कायदे हाणून पाडणें, हें कोणाहि हिंदी देशभक्ताचें कर्तव्यच होते. टिळकांनी तेंच केलें; पण तसें करतांना कामगारांच्या हिताकडे त्यांनी दुर्लक्ष केलें होतें, त्यांचे दारिद्रय अपरिहार्य आहे, असे ते म्हणत होते, असें मात्र नाही. प्रारंभापासूनच सर्व कष्टकरी जनतेच्या हिताची चिंता ते करीत होते आणि त्या लोकशक्तीला जागृत व संघटित करून तिच्या करवीच तिचा व भारताचा मोक्ष साधावयाचा, हें त्यांचें धोरण होतें. वर निर्देशिलेल्या रशियन पंडितांच्या आधारेच त्याचें स्वरूप पाहूं.
काँग्रेसचें पहिलें अधिवेशन झालें त्या वेळी मराठा पत्रांत तिच्या संयोजकांचें अभिनंदन करून टिळकांनी लिहिले की, "कोट्यवधि जनतेच्या वतीने आम्ही यां संयोजकांचे आभार मानतों. कारण त्या जनतेला संघटित करण्याची खरी आवश्यकता आहे.' (हा प्रारंभ आहे. पुढे-मागे जनतेपर्यंत काँग्रेस पोचेल ही अपेक्षा). यावरून हे स्पष्ट आहे की, कोट्यवधि जनतेची काँग्रेस प्रतिनिधि व्हावी ही प्रारंभापासूनच टिळकांची अपेक्षा होती. भारताच्या इतर कोणत्याहि नेत्याच्या दृष्टीचा पल्ला इतका दूरवर गेला नव्हता; आणि 'मराठा'खेरीज कोणत्याहि वृत्तपत्राने अशा आकांक्षा व्यक्त केल्या नव्हत्या." (टिळक अँड दि स्ट्रगल फॉर इंडियन फ्रीडम, पृ. ४४).
लो. टिळकांनी शेतकऱ्यांत जागृति करण्यासाठी कोणत्या चळवळी केल्यां त्याचें मागे वर्णन केलेंच आहे. त्यांनी मजूरवर्गांत कशी जागृति केली त्या विषयी चिचेरोव्ह याने पुढील माहिती दिली आहे. टिळकांचे अनेक कार्यकर्ते गिरणी- कामगारांमध्ये जाऊन मजूर म्हणून राहत असत. हे बहुतेक सर्व ब्राह्मण असत त्यामुळे कामगारांना हे वरिष्ठ जातीचे लोक आपल्यांत राहतात याचा फार अभिमान
के. त्रि. १९