Jump to content

पान:केशवसुत यांची कविता.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केशवसुत यांची कविता.

       [१]
       
       

खिडकीकडे मौज पहावयास.

       श्लोक 

मजा पहायास विलोल बाला

सौधांवरी काञ्चनयुक्त जाला

तयीं त्वरेने लगटून येती,

राहोनि अन्य व्यवहार जाती.


जाळीकडे एक जवे निघाली,

कचांतली बंधनमुक्त झाली—

पुष्पे, न बांधू सुचले तियेस,

रोधी करे ती जरि केशपाश.


कोणी, सखी रंगविता पदाला—

ओढून, ये तूर्ण पहावयाला;

लिलागती विस्मरली सदाची,

अलक्तचिन्हे उठली पदाची!


एकांत जो अंजन लोचनांत—

घालूनि, घालू म्हणते दुज्यांत

तशीच तो धावुनि ये गवाक्षी

काडी करी राहुनि कुड्मलाक्षी!