________________
२७० केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. वले. तेव्हां आतां ह्यास उपाय काय? माझ्याने हा प्रपंच निभत नाही. कोण ते पुढे होऊन पहा, असे सांगितले. तेव्हां सर्वासच दिशाभूल झाली, कोणास कांहींच सुचेना. जे ते आपआपसांत एकमेकांच्या तोंडाकडे पाहूं लागले. कारण, जमाखर्च झणजे काय आणि हिशेब ह्मणजे काय, हे तरी आजपर्यंत घरांतील मुलांपैकी कोणांस माहित होतें ? त्यांनी हे लक्षावधि रुपये कर्जाचें नांव ऐकतांच चिमणीसारखी तोंडे केली, व आमच्या कोणाच्याने कांहीं हे झेंपत नाही, व आमांस त्यांत कळत नाही असे साफ सांगितले. तेव्हां त्या कारभाज्याने सांगितले की, तर मग इतक्या मनुष्यांचा प्रपंच कांहीं निभावयाचा नाही. ह्याकरितां तुह्मी आपआपल्या बायकांच्या आंगावर जेवढे कांहीं हजार पांचशेचे दागदागिने आहेत तेवढे घेऊन आपआपला रस्ता सुधरा. ह्मणजे मग मी देण्याघेण्याचा बेवारा करतो. ह्या सांगण्याप्रमाणे घरांतील प्रत्येक असामी, आपआपल्या बायकोच्या आंगावर होते तेवढे दागदागिने घेऊन ईश्वर वाट दाखवील तिकडे निघाला. त्यांपैकींच विष्णुरोटींचे वडील केशवशेट हे एक होत. त्यांस हो पूर्वीपासून व्यापार वगैरे करण्याचे विशेषसें धोरण नव्हते. हे मागें सांगितलेच आहे. तेव्हां सर्वांप्रमाणे त्यांसही पंचाईत पडली की, आतां जावें कोठें ? तेव्हां अर्थात्च आपआपले इष्ट आप्त शोधावयाचे, हा पहिला मार्ग. त्याच मार्गाचा केशवशेटींनीही अवलंब केला. केशवशेटीची सासुरवाडी वेंगुर्ल्यास अरवारी ह्यांच्या येथे होती. त्यावेळी अरवारी ह्यांचाही काल चांगला असून तेही घरचे मोठे संपन्न होते. तेथे केशवशेट आपल्या कुटुंबासहवर्तमान जाऊन राहिले, व त्यांच्याच आश्रयाने कांहीं व्यापारधंदा पाहूं लागले. प्रथम प्रथम ते घाटावर जाऊन बैलांवरून गहूं वगैरे खरेदी करून ते बंदरांत विकावयास आणीत. परंतु त्या व्यवसायाचे कधीच गम्य नसल्यामुळे, किफायत बहुधा जितक्यास तितकीच असे. पण हा त्यांचा व्यापारही परमेश्वराने फार दिवस चालविला नाही. केशवशेट हे एका खेपेस घाटावर गेले असतां, तिकडेच निवर्तले! आणि त्यांची लहान लहान मुलें केवळ, उघडी पडली. सांप्रत राजापुरास रा. रा. गोविंद मोतिराम शेट सांपळे झणून जे