Jump to content

पान:केरळ कोकीळ.pdf/737

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १९ वें. दोन, तीन तीन, चार चार फणांचे सुद्धां नाग कां दृष्टीस पडूं नयेत ? परंतु सृष्टि ही अनंतानेच केलेली असल्यामुळे तीही अनंतच आहे. तेव्हां अर्थातच ती सर्वांगपरिपूर्ण रीतीने पहावयास आपणांपाशी अनंत डोळे नाहीत येवढीच कायती कमतरता आहे. आपल्या सुकृताच्या हिस्सेरश्शीप्रमाणे अवघे दोनच चर्मचक्षु आमच्या वांटणीस आले आहेत. त्यांच्या संकुचित कक्षेमध्ये प्रारब्धगतीप्रमाणे केव्हां तरी ह्यांपैकी एखादा चमत्कार दृष्टीस पडला तर पडावयाचा, व त्याप्रमाणे तो पडतोच. आज दोन फणांच्या नागाचे वर्णन द्यावयाचे आहे. हा नाग इ० स० १७६१ मध्ये लंदन शहरांतील एका बागेत आढळला होता. हा लहानसर जातीचा सर्प होता. हा पंधरा इंच लांब असून मध्यम प्रतीचा मोठा होता. तो शेपटाकडे एकसारखा बारिक होत गेलेला होता. तोंडाकडे मात्र मोठा मोठा होत गेलेला असून त्याची गर्दन भल्ली जाड दिसत होती. त्याला दोन तोंडे व दोन फणा अपन त्या सारख्या आकाराच्या होत्या. प्रत्येक मस्तक अगदीं सार में परिपूर्ण होते. प्रत्येक तोंडास दोन ह्याप्रमाणे त्यास चार डोळे होते. तोंड मोठे पसरट असून जिभा रीतीप्रमाणे दुभंग होत्या. तोंडांतील दांत विषारी सर्पाच्याच त-हेचे होते. मस्तकाचा रंग गर्द उदी असा होता, आणि पाठीवरची व पोटाखालची खवले काळसर, तांबडसर व कांहीं पिंगट रंगाची अशी होतीं, व ती अगदी हुबेहुब नागाच्या आंगावरच्या खवलांसारखी असत. हा सर्प लहान होता तरी, तो फार भयंकर दिसे. त्याच्या दोन्ही फणांवर दोन दहादहांचे आंकडे स्पष्ट दिसत होते. ज्याजकडून ही माहिती मिळाली तो फार विश्वसनीय पुरुष होता. हा सर्प एका बागेमध्ये सांपडला, व तो तेथच्या तेथेच ठार मारला. त्याचे चित्र व माहिती विलायतेंत प्रसिद्ध होणारे 'पिक्चर म्यागेझाईन' नावाचे एक मनोरंजक व सचित्र मासिक पुस्तक निघते, त्यांतून घेतली आहे. ह्याचा विचार केला ह्मणजे मनास असे वाटते की, पूर्वकालीं ह्या जीवसृष्टीत व तिच्या क्रमांतही फार बदल असला पाहिजे, व तो तसा युगान्युगे असावयाचाच. ५. अशा प्रकारचे अनेक मस्तकांचे प्राणी पूर्वी असतील, तर त्यांचे सांगाडे