________________
अंक ११ वा. नोवेंबर १९०१. २४३ बसण्याची परवानगी द्या ह्मणून मालकापाशी मागणी केली. परंतु मालकाने एकच निश्चय सर्वांस कळविला की, एक लाख रुपयांची सही मटल्यावांचून घोडा ठाणावरून सोडणार नाही. तेव्हां ह्या घोड्यांत एवढा अद्भुत गुण तरी काय ह्मणून श्रीमंतांनी प्रश्न केला. तेव्हां त्या घोड्याच्या मालकाने सांगितले, की एक कोसपर्यंत रबरबित चिखल करा, व त्यावर पांढरी सफेत चादर हंतरा; आणि त्यावरून घोडा फिरवून आणा; त्या चादरीवर जर घोड्याच्या टापांची खूण उठलेली दिसेल, तर एक लाख रुपयांपैकी पै सुद्धा मागणार नाही! हा घोडा श्रीमंतांनीही घेतला नाही, व तो स्वदेशी परत गेला असें ह्मणतात. ह्या घोड्याच्या अप्रतिम गुणांवरून घोड्याच्या वर्णनाच्या एका सुंदर पद्याची आठवण होते. तें पद्य असें आहे:किमंगारवद्गां खुरैः स्पर्शयंतः कुरंगा इवांगांनि संकोचयंतः । अटंतो नटतो भटं तोषयंतस्तुरंगाः सुरंगाः पुरं गाहयंति ॥१॥ "खुराला जणों काय निखारे लागल्याप्रमाणे टप टप टापा उचलीत आहेत; हरणाप्रमाणे जे आपली आंगें चेंडूप्रमाणे संकुचित करीत आहेत; ऐटीने मान मुरडून तिची जणों काय कमानच झाल्याप्रमाणे शोभती आहे; वर बसणाऱ्या योद्धयांना जे संतोष देत आहेत; अशा सुंदर सुंदर वर्णीच्या घोड्यांनी नगरांत प्रवेश केला." ह्या पद्यांत उत्तम घोड्यांच्या गुणांचे सर्व वर्णन असून शब्दरचनेबद्दल व अनुप्रासाबद्दल कवीची तारिफ करावी तेवढी थोडीच वाटते. पेशव्यांचे प्रसिद्ध सेनापती बापू गोखले, ह्यांच्या घोड्याबद्दलही अशीच एक मोठी मजेची आख्यायिका आहे. बापूंचा एक अत्यंत गणी आवडता घोडा होता. त्यावर त्यांचा जीव की प्राण असे. तो घोडा श्रीमंतांच्या मनांत फार भरला. आणि संधि पाहून खुद्द श्रीमंतांनीच बापूंपाशी गोष्ट काढली की, आपला हा घोडा आह्मांस द्यावा. बापूना तर तो घोडा दुसऱ्यास देणे ह्मणजे जीवावरची गोष्ट होती हे तर उघडच आहे. तेव्हां त्यांनी लगेच उत्तर दिले "महाराज! हा घोडाचसा काय ? पण त्याजवरचा राउतही आपलाच आहे." तेव्हां अर्थातच