Jump to content

पान:केरळ कोकीळ.pdf/706

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १० वा. अक्टोबर १९०१. २३३ दोन मनुष्य एका दिवसांत पांच शिलिंग मिळवितात. दोघांची टा. पटीप एकसारखी असून कुटुंबांतील रहाटीही सारखी असते, आणि खचवंचही सारखाच असतो. तरी त्यांतील एक ह्मणतो, मला शि. ल्लक टाकतां येत नाहीं, ह्मणून मी टाकित नाही. पण दुसरा ह्मणतो, मला शिल्लक टाकतां येते, आणि तो त्याप्रमाणे नियमाने आपल्या शिलकेंतील काही अंश सेव्हिगब्यांकेमध्ये अमानत ठेवतो, आणि शेवटी सधन होतो. जातीचा दारिद्यांतील अडचणी साम्युएल जान्सन्ला पक्या कळून चुकल्या होत्या. एकदां तर त्याने 'उपाशी' किंवा 'अन्नहीन' अशीच आपल्या नांवाची सही केली होती. रात्रौ डोके कोठे टेंकावें हे न सुचल्यामुळे तो सारी रात्र मांगरामोशांबरोबर हिंडे.लहानपणांत अनुभवलेली भिकार स्थिति जान्सन् कधीच विसरला नाही. आणि तो नेहेमी आपल्या मित्रमंडळीला ती न येऊ देण्याविषयी सल्ला देत असे. सिसरोसारख्यांनी खात्री करून घेऊन झटले आहे की, संपत्तीचा आणि क"याणाचा काटकसर हा एक झरा आहे. त्याने तिला मागच्या पुढच्या विचाराची मुलगी; नेमस्तपणाची बहीण; आणि स्वतंत्रतेची आई मटले आहे. तो ह्मणतो "दारिद्य हे भौतिक व नैतिक सत्कृत्ये करण्याच्या साधनाचा सर्वतोपरी लोप करिते; व संकटास प्रतिबंध करण्याच्या कामांत अतिशय अशक्तता आणते. ह्याकरितां गरिब न होण्याचा निश्चय करा. जे काय तुमच्यापाशी असेल, त्यापेक्षा कमी खर्च करा; मितव्यय हा केवळ शांततेचाच पाया आहे असे नाही, तर परोपकाराचा सुद्धा पाया आहे. ज्याला स्वतःलाच गरज लागलेली अ. सते, त्या मनुष्याला दुसऱ्याची गरज भागवितां येत नाही. दुसऱ्याला देण्यापूर्वी आपणांजवळ पुरेसे पाहिजे." तो पुन्हा ह्मणतो "दारिद्य हा मनुष्याच्या सुखाचा कट्टा शत्रु आहे. तो खातंत्र्याचा फडशा पाडून सोडतो, आणि कित्येक गुण असाध्य करतो, व कित्येक फारच दुर्लभ करून देतो. ज्यांना ज्यांना दारिद्य ह्मणून महाभयंकर वाटते, त्यांनी त्यांनी पूर्वकालीन होऊन