Jump to content

पान:केरळ कोकीळ.pdf/654

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ८ वा. आगष्ट १९०१. १८१ जर्मनीला युद्धाचा शोक आहे; जपानाला सुधारणेचा शोक आहे; अमेरिकेला स्वातंत्र्याचा शोक आहे; इंग्लंदला यंत्रशास्त्राचा शोक आहे. त्याप्रमाणे आमच्या देशाला प्राचीन कालापासून अध्यात्मविद्येचा किंवा परमार्थाचा शोक आहे, व तो सर्वांत श्रेष्ठ प्रतीचा आहे, ह्यांत तिळमात्र शंका नाही. परंतु नित्यजलविहाराची हौस असलेला मनुष्य साहरा वाळवंटामध्ये जाऊन पडावा, तशी तूर्त आमची दशा झाली आहे. आमच्या देशांतील प्रत्येक सद्वस्तूची दुष्काळाने पाठ पुरविली आहे हे खरे; पण अध्यात्मशास्त्राच्या तर तो हात धुवून पाठीस लागला आहे, झटले तरी चालेल. दुष्काळांत दीनदुबळी जशी अन्न अन्न करीत दारादार हिंडत फिरतात, कोणी अंमळ बरासा दृष्टीस पडला की त्याच्या पुढे दीनवाणीन गयावया करतात, बापुडवाण्या मुद्रेने तोंडाकडे पहातात, व आरोपी दाता त्यांच्याकडे ढुंकूनही न पाहतां पुढे निघून गेला झणजे हिरमुष्टी होऊन बसतात, तसाच प्रकार हल्लींच्या मन्वंतरांत झाला आहे. आमच्यांतील बरीच मंडळी परमार्थासाठी तर हापापलेली; आणि त्याचे कर्णधार जे साधुसंत त्यांचा तर बहुतेक अभावच झालेला दिसतो. कल्पतरू जसा कोठे दृष्टीस पडत नाही; तामणी जसा नामशेष होऊन राहिला आहे; परीस जसा नेपाळांतील एका 'पशुपती'च्या मूर्तीमध्येच दृष्टीस पडतो; व तोही जसा वर्षातून एकदां 'थोडेंच सुवण देतो,' त्याप्रमाणे खरे खरे साधूही दुर्मिळच झाले आहेत. तेव्हां अर्थात्च भवदवानं तप्त झालेले, व परमार्थतृष्णेनें घोपलेले जिज्ञासु मृग रखरखीत अरण्यांतून 'लाहा' 'लाहा' करीत भटकत फिरत असतात. जरा कोठे अध्यात्मतेजाची झुळुक दृष्टीस पडली की, तुडुंब भरलेल्या सरोवराचा ठेवा आपल्या हाता लागला; आत्म्यास गारीगार करून टाकणारी, देहास अजरामर करून साडणारी साक्षात् भागीरथी आपणापुढे जणों काय चालतच आली, असे मनामध्ये मांडे खात खात, व धापा टाकित टाकित हा प्रदेश गांठ; तो प्रदेश गाठ, हिकडे धूम ठोक; तिकडे धूम ठोक; अशी पायपिटी करीत असतात, पण जवळ जावें तो काय ? सारेंच मृगजळ ! पहिल्याहून अधिकच ताप !. देव व्हावा देव व्हावा । ऐसा मानवाचा धांवा ॥ भिंत येई काकुळती । मज दाखवावी माती॥ येई काकुळती ऊस । ह्मणे दाखवावा रस ॥ येई काकुळती जळ । मज करावें पातळ ॥ तुका ह्मणे तुझ्या देहीं । तूंच शोधोनियां पाहीं ॥१॥