Jump to content

पान:केरळ कोकीळ.pdf/512

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ रा. फेब्रुवारी १९०१. ढदिवस ? ह्मणून त्याचा त्या विचार करीत. आणि ज्याचा वाढदिवस असेल, त्याच्याडे काहीतरी सुंदर देणगी पाठवून देत. ह्यांत शेवटपर्यंत कधीही अंतर ह्मणून पडले नाही. त्यांना लिहिण्याच्या कामी, सही करण्याच्या कामी, मजकूर ऐकून घेण्याच्या कामी कधी वास ह्मणून कसला तो वाटत नसे. मुख्य प्रधान त्यांच्याकडे सरकारी महत्वाच्या माचे कागद सही शिका करून घ्यावयाला किंवा समजून द्यावयाला जात असत. यांनी एकदा त्यांस नम्रपणे विनंति केली की, “ ह्या कामांत राणीसाहेबांस थोडा त्रास पंडेल खरा, पण असे केले तर चांगले होणार आहे." हे ऐकून राणीसाहेब ह्मणाल्या "मला त्रास पडेल, हे शब्द पुन्हा कधीच उच्चारू नका व मनांतही आणू नका. ज्यांत राजकारणाचे धोरण आहे, प्रजेचे कल्याण आहे, तें काम कितीही खटपटीचे असो, मला नीट समजून देत चला. तें मी आनंदाने करीन.” ह्यावरून त्या राजकार्य करण्याला प्रजेच्या कल्याणाला किती दक्ष व तत्पर असत हे सहजी व्यक्त होते. ह्याशिवाय, मोठमोठाले गृहस्थ, प्रधान, परकी देशांतील राजे, संस्थानिक, प्रवाशी हे त्यांजकडे नित्य भेटीस यावयाचेच. तितक्या सर्वांचीही त्या परमादराने भेट घेत, व त्यांच्यापाशी यथोचित भाषण करीत, व त्यांचे सौजन्य पाहून प्रत्येकाच्या मनांत त्यांच्या विषयीं पूज्यभाव उत्पन्न होत असे. कोणीही भेटावयास येवो, त्या त्यास कधीही विन्मुख दवटीत नसत. इतकेच नव्हे, तर मागें कामाची कितीही छकट असली तरी, त्यास एखाद्या साया व सज्जन मनुष्याप्रमाणे सावकाशपणे क्षेमकुशलप्रश्न विचारीत, व त्याचे बोलणे लक्ष्यपूर्वक ऐकून घेत. जरूरीचे कागदपत्र पहाण्याचे काम, किंवा दिवसा राहिलेले काम व्या रात्री करीत. इतकें सर्व सांभाळून त्यांनी आपल्या प्रवासांतील हकीगतीची व इतरही फार मनोरम पुस्तकें व ग्रंथ लिहिलेलेही प्रसिद्ध आहेत. येवढ्यावरून त्यांच्या विशाल उद्योगशीलतेचे स्वरूप वाचकांच्या अंतःकरणापुढे थोडे तरी उभे राहीलच! राणीसाहेबांचा दुसरा सद्गुण झटला ह्मणजे दयाई अन्तःकरण हा होय. हा गुण हणजे माक्षात् दैविक अंश असतो, हे काही सांगणे नकोच. मनुष्याला जी काय योग्यता, साधुत्व, व ईश्वरस्वरूप प्राप्त होतें तें ह्याच गुणाने. हा गुण त्यांच्या आंगी केवळ अप्रतिमत्वाने राहत होता. त्यांचा गादीन्शन चुलता वारला, व त्या इंग्लडच्या स्वामिनी झाल्या तेव्हां, पूर्वीची राणी झणजे यांची काकी, अर्थातच निष्प्रभ होऊन उघडी पडली. ती पूर्वीच्याच वाड्यांत राहत होती. तिच्या मनांत आले की, ह्या राजवाड्यावर आतां आपला हक्क नाही; ह्या वाड्याची मालकीण आतां दुसरी झाली. ह्याकरितां आपणास हा वाडा आतां सोडून गेले पाहिजे. परंतु आपल्या पतीचा प्रेतसंस्कार वगैरे होईपर्यंत तरी आपणास येथे रहावयास मिळावें अशी तिची इच्छा होती. ह्मणून तिने फार काकुळतीने, असलेल्याच राजवाड्यांत राहण्याविषयीं ह्या नव्या महाराणीसाहेबांस परवानगी विचारली. त्यावर ह्या उदार महासाध्वीने उत्तर दिले " काकूनी आपल्या सोईस व कृतीस जे काय इष्ट असेल व बरे वाटेल तें खुशाल करावें, आणि जेथे हवे असेल तेथें रहावे. हे उदार मनाचे उत्तर कोणीकडे, व राज्यक्रांती होतांच पहिल्या राणीला व प्रधानादि माणसांना राजवाड्यांतून धुडकावून