________________
२५४ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. ह्या चाली काय ? पदें काय ? आणि त्यांतील रस तरी काय ? Something is better than nothing ' येवढीच ह्मण साजरी करावयाची असेल, तर तो भाग निराळा. पण आपलें काव्य काही तरी लोकमान्य व्हावे अशी इच्छा असेल, तर त्याने मात्रांत इतका सरळपणा आणला पाहिजे की, स्वराला कोठे यत्किचित्ही ठेच न बसेल. रबराची धांव असेल, तर तें सुखासन; नाही तर खटारा ! हे काय सांगितले पाहिजे ? संगीत कवीला बहुधा आपल्या रागरागिणींचे घोडे कोठे दुडकी, कोठे सात्रक, कोठे भरधांव अशा चालीवर धरून जेमतेम मुक्काम गांठण्याची टेव पडलेली असते. पण पदाशिवाय इतर छंद आले, की त्यांचे बेंड पट्कर बाहेर पडते. खालची साकी पहा: कालिदास कविनिर्मित नाटक मालविकाग्निमित्र ॥ प्रयोग त्याचा करुनि वसंती दाविं वदति मज अत्र ॥ हे की सभाजन ॥ यास्तव करि तूं गान ॥ धृ०॥ साकीच्या प्रत्येक चरणामध्ये अहावीस मात्रा लागतात, हे तर प्रसिद्धच आहे. असे असतां पहिल्या चरणांत मात्रा आहेत सव्वीस, हाणजे दोन कमी !! तेव्हां प्रस्तुत संगीतकर्यांना छंदःशास्त्राची माहिती आहे ह्मणून समजावयाचे, कां नाही ह्मणून समजावयाचें ? आहे झटले तर, बिगाऱ्याच्या वर्गात बसावे लागेल, आणि नाही झटले तर, बहुरुप्याच्या वर्गात बसावे लागेल ! ! ' अत्र' शब्दाची कोमलता तर काय, निवडुंगाच्या फणीला मागे सर ह्मणते आहे. सारे शब्द प्राकृत असून मध्येच 'अत्र' सारखा अपरिचित संस्कृत शब्द रेटून देणे ह्मणजे 'रकट्याला शालनाम्याचे ठिगळ, अशांतलाच न्याय होय. 'दावि वदति मज' येथे, कृष्णातीरच्या वाळंत चटका बसल्याप्रमाणे, स्वराला कसे जलद पाऊल उचलावे लागते, हाही मासला ध्यानात ठेवण्यासारखा आहे. आतां एक कामदा वृत्ताचा नमुना:शिक्षणामधीं मत्सुकुशलता ॥ दावितों विवादी इथे अतां ॥ करुनियां दया देइं अनुमता ॥ नातरी गमे मजसिं त्यागितां ॥१॥ सर्वाश्चर्यमय' जसें आकाश, त्याप्रमाणे सर्वदोषमय' वरचा श्लोक असें झटले तर फारशी अतिशयोक्ति होईल असे वाटत नाही. एका चरणांत एक गण, तर दुसऱ्या चरणांत दुसरें, आणि तिसऱ्यांत तिसरेंच ! जणों काय एक भाग माहीं माय, निवडुंगाच्यावर