Jump to content

पान:केरळ कोकीळ.pdf/455

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४२ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. जेब्रे हे कळप करून राहतात. त्यांना टेकडीवर राहणे फार आवडतें. ते आपले भक्ष्य वगैरे शोधण्यासाठी मैदानात उतरतात, पण तेथे फार वेळ थांबत नाहीत. हे प्राणी अतिशय भित्रे असतात. ह्यांना एखादा चमत्कारिक प्राणी दृष्टीस पडला, किंवा विचित्र शब्द ऐकू आला, की ते लगेच डोंगराकडे धांव घेत सुटतात. आफ्रिकेंत प्रवास करणाऱ्या लोकांना झऱ्यावर पाणी प्यावयास आलेले जेन्याचे कळपच्या कळप दृष्टीस पडतात. त्यांची पाणी पिण्याची वेळ बहुधा सकाळी सूर्योदयापूर्वी, व सायंकाळी सूर्यास्तानंतर असते. ती संधि साधून सिंह बहुधा त्यांच्यावर हल्ला करतो. जेन्यांना सिंह हा एक मोठा भयंकर शत्रु आहे. त्याचा त्यांस सुगावा लागला, किंवा वास आला पुरे, की लगेच ते बेहोष होऊन टेकाडावर पळत सुटतात, व हां हां ह्मणतां मैदानांतून पार होतात ! स्वच्छ चांदणे पडले ह्मणजे जेब्रे पाण्यापाशी जमून यथेच्छ विहार करतात. तशा वेळी सिंह तेथे येण्याची फारशी धास्ती नसते. कारण, तो आला तर, तत्काल त्यांच्या दृष्टोत्पत्तीस येतो. गर्द काळोख असला, ह्मणजे सिंहाची मोठी चलती असते. कारण, तशा वेळी त्याला लपून छपून जाण्यास संधि सांपडते, आणि त्यामुळे त्याचा आवडता व सुंदर भक्ष्य जो जेब्रा, त्याच्यावर त्याला यथेच्छ ताव देण्यास सांपडतो. जेन्यांमध्ये 'कागो ह्मणून एक जात आहे. त्याचे पोट व पाय स्वच्छ पांढरे असतात, व साऱ्या आंगाचा रंग उदी असतो. जेब्रे हे प्राणी अत्यंत सुंदर व उपयोगी असून ते मुळीच माणसाळत नाहीत, हा फार चमत्कार आहे. त्यांना धरून बाळगलेच तर कांहींसे मनुष्याला जवळ येऊ देतात, पण घोड्याप्रमाणे किंवा गाढवाप्रमाणे काम तर कधींच करणार नाहीत ! त्यांना नेहेमी डोंगराळ प्रदेशांत राहणे, मैदानांत उड्या मारणे, बागडणे ह्यांतच मजा वाटते, व स्वतंत्रतेंतच राहणे आवडते.