________________
अंक १० वा. आक्टोबर १८९९. २३९ मैदान आता जवळच आहे. 'भारद्वाज' आपेगांवच्या देवीचें नांव ' कोणत्या पोतडीतून बाहेर काढतात; नेवाशाची गोदावरीच्या उत्तरतीरी कशी स्थापना करतात; नेवाशांतील महालयाचे उच्चाटण कोठे करतात; 'महालया'माहास्म्याला कोणत्या महासागरांत जलसमाध देतात; व नेवाशांतील ज्ञानेश्वराचा खांब कोणत्या आकाशांत झुगारतात येवढीच करामत तूर्त दृष्टीस पडली तरी पुरे. पुढचे ओझें पुढें आहेच. पुढे ना० रानड्यांचा आनंद:" एकनाथाच्या आधींची ज्ञानेश्वरी कशी होती याचा शोध लागल्याने जन्माच्या अनेक नादांपैकी एक नाद पुरा झाला, असें वाटून आनंद झाला;" नामदारांच्या जन्माच्या अनेक नादांपैकी एक नाद पुरा करून त्यांस आनंद देणारी एकनाथाच्या दुरुस्तीच्या आधींची ज्ञानेश्वरी कोणती? हे मात्र समजत नाही. नामदारांस खरोखरच प्राचीन मिळालेली प्रत असती, व खरा जानद झाला असता, तर आह्मी सुद्धा त्या आनंदाचे अंशभाकू झालो असतो. 'भारद्वाज' जी ज्ञानेश्वरीची प्रत आपणांस उपलब्ध झाल्याचे सांगतात, तिचा इतिहास पूर्वी दिलाच आहे. ती एकनाथाच्या शुद्धीनंतर पावणेदोनशे वर्षांनी लिहिलला आहे. ती अस्सल प्रतीशी मिळत नाही, व नव्या प्रतीशीही मिळत नाही. हणजे 'शिवशिव न हिंदर्न यवनः' अशी तिची स्थिति आहे. ती कोणत्याच नशा मिळत नाही, व तीत कमजास्त ओव्या आहेत येवढ्यावरूनच ती दोन प्रतीवरून उतरली असावी असा 'भारद्वाजां'चा वायफळ तर्क मात्र! ती प्रत एकनाथाच्या पूर्वीची कशी काय होते ? 'भारद्वाजां'नी 'प्राचीन' असें निरर्थक नांव दिल्याने तिला खरोखर प्राचीनत्व येते की काय ? तेव्हां 'मूले कुठारा' ह्या न्यायाने ती प्रतच जर मुळी भ्रामक, तर तिच्यापासून नामदारांस होणारा आनंदही भ्रामकच होय. अशा प्रकारे नामदारांच्या सत्यानंदाचा अस्त झाल्यामुळे आहासिही दिलगिरी वाटते, पण उपाय नाही. आता 'सुधारका'ने काढलेलें प्रत्येक वाक्य, व 'भारद्वाजांच्या तोंडांतून निघालेला प्रत्येक शब्द, वेदवाक्य समजून 'शिरसि' धारण करणे असेल तर ती गोष्ट निराळी. मग आह्मीही आपल्या ले. खणीला कलमदानांत ठेवून 'तुका ह्मणे उगी रहावें जें जें होईल तें तें पहावें' ह्या मंत्राचे पुरश्चरण करित बसतो. पण सत्यान्वेषणाचा काही विचार मनांत आणून साधकबाधक प्रमाणे पहाणे असतील तर, ती सादर करणे आमचे कर्तव्य आहे. असो. नमनालाच धडाभर तेल' खर्च झाल्याप्रमाणे ही आ•