Jump to content

पान:केरळ कोकीळ.pdf/371

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. ब्याच्या खाणीजवळ न थांबतां साधूने सांगितल्याप्रमाणे पुढेच चालू लागला. तेव्हां त्यास रुप्याची खाण लागली. त्यांतील नेतां येईल तेवढे रुपे घेऊन तें विकले. त्याचा पैसा पहिल्याहूनही अधिक आला. ह्याप्रमाणे प्रत्येक दिवशी पुढे पुढे जाऊ लागला तशा तशा त्यास सोन्याच्या आणि हिऱ्याच्या खाणी लागल्या. आणि सरतेशेवटी तो मोठा श्रीमान् झाला. सत्यज्ञान प्राप्त झाल्यानंतर जो त्यांतच पुढे पुढे घुसतो, त्या मनुष्याची स्थिति अशाच प्रकारची होते. अद्भुत शक्ति आणि विलक्षण सामर्थ्य ह्यांचा यत्किचित् अंश प्राप्त झाला की, जो न थांबतां तसाच पुढें घुसतो, तोच अखेर सत्य व शाश्वत ज्ञानाच्या वैभवास चढतो. ४३ आपण प्रथमतःच हाताला तेल लावून मग फणस फोडला तर त्या फणसाचा चीक आपल्या हाताला लागत नाही, आणि आपल्याला त्रासहा हात नाही. तद्वत् परमात्म्याच्या सत्यज्ञानाचें तुह्मी आपल्याला एकदा अस्तर घालून सोडा आणि मग कनक आणि कांता ह्यांच्या गर्दीत खुशाल रहा. त्यांचा तुझांला यत्किचित्ही सांसर्ग बाधणार नाही. ४४ जो पोहावयाला शिकतो, त्याला काही दिवस पोहावयाचा अभ्यास करावा लागतो. एकाच दिवसाच्या अभ्यासाने कांही समुद्रांत पोहतां यावयाचे नाही. तसें ब्रह्मसागरांत तुह्मांला पोहावयाचे असेल तर त्यांत तुझा पटा हणारे होईपर्यंत, प्रथमतः तुझांला अनेक निष्फळ यत्न केले पाहिजेत. ४५ मनुष्याला मुक्ति केव्हां मिळेल ? त्याचा अहंकार रसातळास जाईल तेव्हा. ४६ एखाद्याच्या पायांत तीक्ष्ण एखादा कांटा शिरला, तर पहिला कांटा काढ• साठी तो दुसऱ्या कांट्याची मदत घेतो आणि नंतर ते दोन्हीही काढून टाकता. त्याप्रमाणे नुसतें विषयज्ञान सुद्धा आत्म्याचे डोळे झांकणारें में विषयक अज्ञान ते काढून टाकते. कारण, तें ज्ञान आणि अज्ञान ही दोन्हीही खरोखर आवयेतच मोडतात. आणखी जो मनुष्य उच्च प्रतीचे किंवा परमात्म्याचे ज्ञान प्राप्त करून घेतो, तो अखेरीस आपण द्वंद्वातीत होऊन तें ज्ञान आणि अज्ञान ही दोन्हीही झुगारून देतो. ४७ तुझी मायेच्या खटपटीला बसून तिची विश्वव्यापक भूल स्पष्ट दाखवून द्याल तर, ती, चोर उमगला झणजे जसा पळत सुटतो, तशी तुमच्यापासून पळून जाईल. ४८ परमेश्वराची प्रार्थना मोठ्यानेच केली पाहिजे का? त्याची प्रार्थना तुही वाटेल तशी करा, तरी तो ती ऐकणारच. कारण मुंग्यांची पावले सुद्धा त्याला ऐकू येतात. साठी तो दुसुमत विषयज्ञान मुख