Jump to content

पान:केरळ कोकीळ.pdf/334

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. जून १८९९. १२३ त्याची लढण्याची तन्हा मोठी चमत्कारिक असते. अशा प्रसंगी तो उताणा पडतो, आणि प्राण जाईपर्यंत जवळ येणारांस भयंकर जखमा करित असतो. पण इतक्यांतूनही जर का त्याचे बीळ त्यास सांपडले, तर मग ते खणून काढून त्यास बाहेर काढणे हे शिकारी लोकांस मोठे मुष्किलीचेच आहे. कारण, तसे करावयास त्यांनी खोरी कुदळी बरोबर आणलेली असतात थोडींच! आणि खणावयास काही साधन असलेच तर, त्या विवराचे फांटे इतके लांब गेलेले असतात; व ती जागा इतकी खोल व विस्तृत असते की, त्या प्राण्याचा शोध लावण्याला सबंध दिवसच्या दिवस खर्ची घालावे लागतात. आणि ह्यांचा हा इतका विधि होईपर्यंत तो बिचारा दुसऱ्या कोणत्या तरी वाटेने बाहेर पडून निसदूनही जातो! व्याजर लहानपणी बाळगला असतां सहज माणसाळतो, आणि अतिशय संवयीचा होतो. आणखी, त्याच्या खाण्यापिण्याची काही विशेष दक ठेवावी लागते असेंही पण नाही. कारण, त्याला कोणतेही भक्ष्य चालते. ह्यामुळे हे जनावर पाळावयाला फार सोपे असून दिसण्यांतही गाजिरवाणे असते. ह्याच्या चामड्याचा उपयोग गाडीच्या सरंजामात करतां येतो, व त्यांच्या केसांचे उत्तम ब्रश तयार होतात. आणखी त्याच मास रुचिकर असल्याबद्दल पाश्चात्य लोक सांगतात. esगुरुभाक्त. [ज्ञानेश्वरीचे भाषांतर करतांना मनास तल्लीन करून टाकणारे, ज्ञानामृताने थबथबलेले, प्रेमरसाने डवरलेले, भक्तिभावाने सुगंधित झालेले, दृष्टांतसुरंगाने रमणीयता पावलेले, ईश्वरी प्रसादाने विकसित झालेले असे काही उत्तमोत्तम वेचे; बोधप्रद रूप प्रेमळ दृष्टांतमालिका; त्या कालच्या स्थितीची ऐतिहासिक माहिती इत्यादि टांचून ठेवण्यास संधि मिळाली. त्यांपैकी काही विषयांचा लाभ आमच्या आश्रयदात्यांसही सवडीसवडीने करून देण्याचा विचार आहे. श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या अंगी सर्वांत मोठा गुण झटला हणजे 'निस्सीम गुरुभक्ति' हा होय. तो ज्ञानेश्वरीमध्ये पदोपदी दृष्टीस पडतोच. स्फटिकवत् निर्मल, आणि सुधाकराप्रमाणे शीतल असें जें सोमकांत रूप श्रीज्ञा