Jump to content

पान:केरळ कोकीळ.pdf/327

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. ही आहे असे पुस्तकाच्या पत्त्यांनी श्रद्धा ठेवली स्वतःच पाहिले पाहिजे. नकाशाच्या योगानें तें प्रत्यक्ष पाहण्याची जिज्ञासा वाढेल. त्याच्या पलीकडे त्याची कोणत्याही प्रकारे किंमत नाही. ज्या मनुष्यांची मनें, फक्त पुस्तकांनाच चिकटून राहतात, ती नाश पावतात. सारे ईश्वरी ज्ञान ह्याच किंवा त्याच पुस्तकांत सांठलेलें आहे ह्मणून सांगणे ह्यापेक्षा अधिक भयंकर नास्तिकपणा तो कोणता? जी मनुष्ये ईश्वर हा अनंत आहे ह्मणून प्रतिपादन करतात, तीच त्याला एका लहानशा पुस्तकांत कोंबून भरण्याच्या प्रयत्नाला सरसावतात तरी कशी? लक्षावधि लोकांचे जीव घेतले; कां? तर, त्या पुस्तकाचे जे काय झणणे होते त्यावर त्यांनी श्रद्धा ठेवली नाही ह्मणून ! ईश्वराचं सर्व ज्ञान त्या पुस्तकाच्या पुठ्यामध्येच त्यांना दिसले नाही. ते बाहेरही आहे असे वाटले. हे जीव घेणे, खुन करणे आतां संपले हे खरे; तरा अद्यापपयेत हे जग पुस्तकांतील श्रद्धेत गुरफटलेलें आहे ते आहेच. तुह्माला साक्षात्कार पाहिजे असेल, जाणिवातीत स्थितीला यथाशास्त्र रीतीने पोचणे असेल तर, राजयोगामध्ये मी ज्या निरनिराळ्या पायऱ्या सांगितल्या, त्या आपण ओलांडल्या पाहिजेत. गेल्या व्याख्यानामध्य मा आपणास ज्या प्रत्याहार व धारणा शिकविल्या, त्यांच्यापुढे आपण ध्यान किंवा चित्तैकाग्य यामध्ये पोचतों. मनाला आंतील किवा बार रील एखाद्या निश्चित ठिकाणी एकाग्रतेने राहण्याचा अभ्यास झाला, ह्मणजे त्याला तेथें जणों काय त्या ठिकाणावर मध्यंतरी खंड पडूं न देता, एक प्रकारचा प्रवाह नेण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. त्या स्थितीला ध्यान असे ह्मणतात. हेच ध्यानाचे सामर्थ्य बाह्य ज्ञानाचा जेवढा अश तेवढ्याचा प्रतिकार करता येईल, आणि ते फक्त अंतर्भागांतच तल्लीन होऊन राहील इतके वाढविण्याची जी स्थिति तिचें नांव समाधि. ध्यान, धारणा आणि समाधि ह्या तिहीला मिळून 'संयम' असे मण तात. ह्मणजे मन जर प्रथमतः एका पदार्थावर लावतां आलें, आणि मग तेथेच ते आपणांस पाहिजे तितका वेळ कायम ठेवतां येऊं लागलं, आणि तशाच एकाग्रतेने पदार्थाच्या ज्या अंतर्भागाचे ज्ञान होते, त्याच भागावर राहूं लागले तर, त्या मनाच्या सत्तेखाली प्रत्येक गोष्ट येते. ही एकाग्रतेचीच काय ती ह्या जन्मांतील अत्युच्चस्थिति आहे. मनांत जर अभिलाषाची इच्छा आहे, तर खरें सौख्य ह्मणजे काय तें