Jump to content

पान:केरळ कोकीळ.pdf/290

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. एप्रिल १८९९. इंद्रियाशी संलग्न होईसे करणे, ही गोष्ट फार कठीण आहे. तथापि, मन हे हुकुमबंदें आहे, गुलाम आहे. नाकार "चांगले व्हा;" "चांगले व्हा;" असा जगभर उपदेश चाललेला आपण ऐकतो. जगांतील कोणत्याही देशांत ज्यास “चोरी करूं नको" "लबाड बोलू नको" असें पढविलेले नाही, असें मूल सांपडण्याची मुष्किलच पडेल. पण तसे होण्याला साधन काय ते कोणीच सांगत नाही. नुसत्या बोलण्याने ते कधींच होणार नाही. मग त्याने चोर कां होऊं नये ? चोरी कशी करूं नये हे कांहीं आमी त्यास शिकवित नाहीं. आह्मी फक्त येवढेच सांगतों की "चोरी करूं नको." त्याने आपले मन आवरावें कसें, हे जर आमी त्यास पढवू, तर मात्र आमी त्यास खरोखरी सहाय केलें असें होईल. मन हे जेव्हा एखाद्या विविक्षित ठिकाणी जाऊन तेथे चिकटून राहते, तेव्हांच साऱ्या अंतःक्रिया व बाह्यक्रिया सुरू होतात. ह्या ठिकाणांनाच आह्मी इंद्रियें असें ह्मणतों. मन हे इच्छेने किंवा आपोआपच कित्येक ठिकाणी जाऊन लागून रहातें, आणि त्यामुळेच लोक मूर्खपणाची कृत्ये करून दुःख भोगतात. तेंच मन जर त्यांच्या ताब्यांत राहील, तर ते तसे करणार नाहीत. मन ताब्यात ठेवले, तर काय होईल ? तें आपणहून ज्ञानेंद्रियांच्या ठिकाणावर जाणार नाही. आणि इच्छा व विकार ही दोन्हीही सही ताब्यांत येतील. हे अगदी उघड आहे. पण हे शक्य आहे काय ? अगदी बरोबर शक्य आहे. ह्या अर्वाचीन कालांत सुद्धा आपल्या दृष्टीस पडतें की मांत्रिक-किंवा श्रद्धा उत्पन्न करून रोग बरे करणारे लोक, दुःख, वेदना, दहशत इत्यादि, लोकांकडून होत नाहीत असें ह्मणवितात. त्यांच्या शास्त्रांत थोडासा द्राविडी प्राणायाम पडतो. तरी तोही योगाचाच एक भाग आहे. पण त्यांत ते थोडासा घोंटाळा करतात. अशा उपचारांत जेव्हां मनुष्यांकडून मला काही होत नाही, असें ह्मणवून त्याप्रमाणे त्यांस गुण आलेला दृष्टीस पडतो, तेव्हां त्यांनी खरोखर प्रत्याहाराचेच एक आंग शिकविल्यासारखे होते. कारण, ते मनुष्यावर आपली छाप बसवून त्याचे मन इतकें दृढतर करून सोडतात की, ते इतर ज्ञानाचा स्वीकार करण्याचेच सोडून देते. (मेसमेरिझम ) किंवा निद्रोत्पन्न स्थितीने जे लोक रोग बरे करणारे आहेत,