________________
अंक २ रा. फेब्रुवारी १८९९. ३९ ज्यांस मंडलें असें ह्मणतात, ती, सुषुम्नेच्या बाजूस हारीनेच लागलेली असतात. सर्वात जे शेवटचे तें, पृष्ठरज्जूच्या अगदी मुळाशी असते. त्यास 'मूलाधार' असें ह्मणतात. दुसरें 'स्वाधिष्ठान' होय. शिवाय 'मणिपूर', 'अनाहुत विशुद्ध' वगैरे. आणि सर्वात अखेरचे-तें 'सहस्रार'-किंवा सहस्रदळ कमल चक्र होय. (आणि सर्वांत अगदी खालचें-शेवटचे-तें मूलाधार होय.) ह्यापैकी आमांस काय ती पहिल्या व शेवटच्या ह्या दोन चक्रांचीच जरूर आहे. जेथें सर्व शक्ति व तेजें भरून राहिली आहेत असें जें स्थान तेंच सर्वात शेवटले-किंवा खालचें-चक्र होय., तेथील सर्व तेजोराशि व शक्ति एकत्र करून त्या वर चढवीत चढवीत मेंदूकडे न्यावयाच्या असतात. मनुष्यदेहांत समाविष्ट झालेले, सर्व तेजांत श्रेष्ठ असें जे काय तेज तें 'ओजस्' हे होय, असें योगी ह्मणतात. ह्या ओजस्चा मेंदूमध्ये खजिना भरलेला आहे. हा खजिना मनुष्याच्या मस्तकांत जसजसा मोठा असेल, तसतसा तो मनुष्य अलौकिक सामर्थ्यवान् , बुद्धिवान् , ज्ञानी आणि परमात्मस्वरूपाधिकारी असल्याचे दिसून येईल. हा ओजस्चा प्रभाव होय. एखादा सर्व साधारण मनुष्य गोड भाषेनें बोलेल; त्याचे विचारही उदात्त असतील; परंतु त्याला लोकांच्या मनावर ठसा उमटवितां येणार नाही. दुसऱ्या एखाद्या मनुष्यास भाषा चांगली येत नसेल; किंवा त्याचे विचारही प्रौढ नसतील; तथापि त्या मनुष्याचे शब्द-भाषण-मोहक-चित्ताकर्षक होईल. ही त्याच्या आंगच्या ओजस्ची तेजस्विता होय. तो जें जें काय कल्पनेने करील, तें तें सर्व असेंच तेजस्वी निपजेल. हे ओजस् सर्व मनुष्यमात्रांत कमी किंवा जास्ती प्रमाणाने भरून राहिलेले असते. आणि शरीरांत घडामोड करणाऱ्या सर्वशक्तींची-तेजांची-अत्युच्च पायरी ती हीच-झणजे ओजस् होण्याची. आपणास करावयाचे काय ते फक्त ह्या शक्तींचे रूपांतर होय, हे ध्यानात ठेविलें पाहिजे. विद्युत् शक्तीप्रमाणे किंवा चुंबक शक्तीप्रमाणे बाहेर काम करणाऱ्या ज्या शक्ति, त्याच अंतःशक्तिरूप बनून जातात. स्नायूंच्या शक्ति ह्मणून ज्यांचा अंतर्व्यापार चालतो, त्याच शक्ति ओजमरूप बनतात. योगी ह्मणतात की, कामविकार, स्त्रीपुरुषधर्म इत्यादि गोष्टींत