________________
अंक २ रा. फेब्रुवारी १८९९. अवघड वाटेल. सोपा मार्ग मटला ह्मणजे, उजवी नाकपुडी आंगट्याने दाबून डाव्या नाकपुडींत श्वास ओढून घेणे; नंतर दोन्हीही नाकपुड्या आंगठा व तर्जनी ह्यांनी बंद करा, आणि कल्पना करा की, आपण खाली प्रवाह पाठवून-सुषुम्नेच्या मुळांस धक्केच, देत आहोत. नंतर आंगठा काढून घ्या, आणि उजव्या नाकपुडीतून उच्छ्वास सोडून द्या. पुन्हां, तर्जनीने डावी नाकपुडी बंद ठेवूनच, उजवीन हळू हळू श्वास आंत ओढून घ्या, आणि मग पूर्वीप्रमाणेच दोन्हीही बंद ठेवा. हिंदुलोकांची पद्धत हिकडच्या देशाला-अमेरिकेला-फार अवघड वाटेल. कारण, त्यांस-हिंदुलोकांस-तो लहानपणापासूनच अभ्यास असतो. त्यांची फुप्पुसें तशाच त-हेची बनलेली असतात. हिकडे-अमेरिकेंत-तो अभ्यास चार सेकंदपासून चालू करून हळू हळू वाढवावा हे बरें. चार सेकंद श्वास आंत घ्यावा; सोळा सेकंदपर्यंत आंत धरून ठेवावा; आणि आठ सेकंदांत बाहेर सोडावा. हा एक प्राणायाम झाला. ह्याच वेळी त्या त्रिकोनाची कल्पना करा, आणि त्याच चक्रावर मन एकाग्र करा. अशा भावेनेचे तुह्मांस पुष्कळ सहाय्य होईल. दुसरा प्राणायाम हा की, श्वास हळू हळू आंत ओढून घेऊन, नंतर लागलीच हळू हळू बाहेर सोडावयाचा. आणि नंतर त्याच कालनियमाने बाहेर थोपवून धरावयाचा. फरक येवढाच की, पहिल्या प्राणायामांत श्वास आंत कोंडून धरला होता, आणि दुसन्यांत तो बाहेर थोपवून धरला. हा शेवटचा मार्ग तर फारच सोपा आहे. तुझी जो प्राणायाम करतांना श्वास कोंडून धराल, त्याचा अभ्यास फार करूं नये. फक्त सकाळी चार वेळ, आणि संध्याकाळी चार वेळ करा, ह्मणजे बस्स. ह्यानंतर तुह्मांस हळू हळू वेळ व प्रमाण वाढविता येईल. आपल्या आंगीं तसे करण्याचे सामर्थ्य आहे, असें तुझांस दिसून आले, ह्मणजे तुझांस त्यांत आनंद वाढू लागेल. ह्याकरितां जसजसे आपणांस सामर्थ्य आले असें वाटू लागेल, तसतसें फार बेतानें व सावधगिरीनें, चारीच्या ठिकाणी सहा-सेकंद व वेळावाढवा. अनियमितपणाने अभ्यास वाढवाल, तर तुह्मांस ते बाधक होईल. काEिTAPERaily ज्ञानतंतूंच्या पवित्रीकरणार्थ सांगितलेल्या ह्या तीन पद्धतींपैकीं,