Jump to content

पान:केरळ कोकीळ.pdf/211

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१२ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. संस्कृत त-हेचे अलंकार काय, इंग्रजी रीतीचे अलंकार काय, उपमा काय,Cष्टांत काय, उत्प्रेक्षा काय सारी गर्दीच गर्दी करून दिली! तेव्हां अशा ह्या नववधूच्या दर्शनार्थ उत्सुक झालेल्या लोकांचा तोब्यावर तोबा उसळळा. जवळ जाऊन पाहत तो काय ? सारा मराठमोळा ! टीपांचा भरजरी शालू असा कांहीं पायघोळ पसरलेला, की नख दृष्टीस पडण्याची मारामार, मग मुख पाहण्याइतकी पुण्याई कोणाची ? मग कोठे नख, कोठें एक चरण, कोठे दोन चरण ओझरते नजरेस पडावयाचे! जणों काय हपशी देशांतून बुरखा पांघरूनच आली आहे ! 'केकावली' वर पहिली टीका झणजे 'यशोदा पांडुरंगी' ती ह्याच वर्गातल्या नमुन्याची, हरि झणजे सिंह; हरि झणजे घोडा; हरि झणजे इंद्र; हरि झणजे चोर; हरि झणजे विष्णुः ही तिची धाटी. व हेंच नीट समजून देण्यासाठी 'केकादर्शाने परशुराम तात्यांच्या पोटी जन्म घेऊन 'पांडुरंगाचे' अस्तित्वच बहत करून नाहींसें करून टाकलें, व तिचा अजागळपणा तिच्या पदरांत घातला! ह्या सर्व गोष्टी ओकांसारख्या रसिकवयांस माहित असूनही, हा असा प्रकार झाला किती आश्चर्याची गोष्ट ! 'सोळा किंवा सतरा पानात राहणाऱ्या केवळ १२१ श्लोकांनी २३२ पाने व्यापिली' येवढी प्रौढीच जर जाहिरातीला पाहिजे होती, तर त्याला ओक व प्रो. परांजपे तरी कशाला पाहिजेत ? आमच्या सारख्या एखाद्या प्राकृत जनास सांगितले तरी तो सुद्धां 'पृथ्वीवृत्ताचे लक्षण 'वृत्तरत्नाकरांत' असें आहे; 'सुवृत्ततिलकांत' असें आहे; 'पिंगलात' असें आहे; 'वृत्तदर्पणांतही' असेंच आहे; अक्षरें १७; गण अमुक अमुक; (टीपाकार जणों काय बाळ्याला चवथी यत्ताच शिकवावयाला बसले आहेत ! ) ह्या काव्यात 'प्रकट' शब्द ८ वेळां आला आहे; सदा शब्द ५३ वेळां आला आहे; मेघ शब्द ८७ वेळां आला आहे. ( केवढे अगाध ज्ञान, आणि किती अचाट शोधक बुद्धि !) माता, जननी, माय, आई; दयाळ, दयावंत पुरुष, अंतःकरणांत कळवळा उत्पन्न होणारा, करुणेने ज्याच्या अंत:करणास पाझर फुटतो असा मनुष्य-मानवी प्राणी! अशा टीपांनी दोनशे तर काय, पण दोन हजार बत्तीस पाने सुद्धां खुशाल भरून देईल !! अशा प्रकारे ह्या टीपांचे प्रस्थ दिवसानु दिवस माजत गेल्यामुळे काय परिणाम झाला पहा. मोरोपंतांचे रसाळ भारत ऐक. ण्याच्या इच्छेनें जे प्रथम वर्गणीदार झाले असतील, ते प्रथमच्या अदमासावरून पांच सहा वर्षात तरी तें संपूर्ण हाती येईल ह्या आशेवर चातकाप्रमाणे वाट पहात बसून अखेर ह्या सात आठ वर्षांत कोणी मृत्युमुखी पडले असतील; कोणी