________________
२०६ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. प्रेमें देशहितार्थ देह झिजवी, जो चंदनाचे परी आनंदें मज वाटते सहज तो, गावा महात्मा तरी ॥ १ ॥ हा सत्यास्तव देह सिद्ध करि जो, काळास दे आहुती सत्याचा वध होउं दे न परि या, देहार्थ जो सन्मती । साधूसंतमहंतमंडळपदीं, जो जाउनी बैसतो तत्सत्कीर्तिपटांत नांव चिर जो, नोंदावया पाहतो ॥ २ ॥ मारी राज्यसुखास लाथ अवघ्या, आले जरी चालुनी इच्छी केवळ जो निरंतर सुधी, सेवा जनांची मनीं । "राष्ट्राचा जनिता' जनाकडूनि हैं, जो नाम संपादितो तत्सत्कीर्तिपटांत नांव चिर जो, नोंदावया पाहतो ॥ ३॥ तो सत्यव्रत धर्मराज ढळला, ज्याला रणी एकदा झाले की वश राजबाळ वधितां, जे न्यायमंत्रीपदा । तें, जे सत्य अखंड निर्मल असें, तें नीतिधैर्य स्वयें नेमें साध्य करोनि कीर्तिसदनीं, जो राहिला निश्चयें ॥ ४ ॥ ऐसा थोर गुणें अमूल्य पुतळा, जो मान्य सर्वीसही दुर्दैवें पडला अचानक कसा, जावोनि कारागृहीं । एकाकी, सुटला परंतु, अमुच्या पूर्वेकभाग्योदयें साधे वर्तन तें प्रभूस रुचलें, आली दया निश्चयें ॥ ५ ॥ जरठ भरतभू जी, बाळ जो थोरतीतें तिलक खुलत भाळी, भव्य जो भार तीतें । सुरभवनि दया ये कां न गंगाधराला टिळक झळकती हे आज येतां घराला ॥६॥ १ सत्यासाठी स्वतःचा देह खर्ची घालणारा साक्रेटिस महासाधु. २ अमेरिकेस स्वातंत्र्य देणारा जार्ज वाशिंग्टन महात्मा, Father of the Nation. ३ नारायणराव पेशवा मारला गेल्यानंतर. ४ न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे ह्यांनी राघोबादादास देहांत प्रायश्चित्त पाहिजे असे सांगितले. अशा शब्दांनी जे न्यायाधीश पदाला वश झालेले.