Jump to content

पान:केरळ कोकीळ.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ७ वा. जुलै १८९८. १६७ तिच्या रुचीविषयी मनापासून तारिफ करतात. ह्या वनस्पतीचे आयुष्य घटकेवारी असल्यामुळे तिचा उपयोग करणे तर, ताजेपणींच-ह्मणजे ती उत्पन्न होतांच करावा लागतो. दुसरे उदाहरण जनावरांच्या शिंगांचे. जनावराचे शिंग जर जमिनीत पुरून ठेवलेले असले, आणि त्याचा शेंडा वर असला, तर पावसाळ्यांत त्याला कोंब फुटून पाने येतात. आणि जमिनीत मुळे पसरतात! ह्यावरून प्राण्यांच्या मृत अवयवांपासूनही वनस्पति उगवतात, हे सिद्ध होते. इतकेच नव्हे, तर सेंद्रिय पदार्थांपासून जशा वनस्पति उगवतात, तसेच प्राणीही पण उत्पन्न होतात. ह्या सर्व गोष्टींचा विचार केला ह्मणजे प्राणी व वनस्पति ह्यांची मूलबीजें कशी चमत्कारिक आहेत, व ती किती व्यापकतेने पसरली आहेत, ह्याचे बरेंच अनुमान होते. अगदी सूक्ष्मापासून स्थूलापर्यंत कोट्यवधि प्राणी वनस्पति असलेल्या आपण डोळ्यांनी पहातो. डोळ्यांनी पण ज्यांचे स्वरूप आपणांस दिसत नाही, असे प्राणी व वनस्पतिही पण कोट्यवधि आहेत. थोडीशी हवा सर्द झाली, की पुस्तकावरून बुरा आलेला आपण पहातों. फार कशाला.? भाकरी जर एक दोन दिवसांची शिळी असेल, आणि ती सर्द हवेत असेल, तर तिच्यावरही बुरा चढतो. हा बुरा ह्मणजे काय ? ह्याचा शोध करण्याकरितां आपण जर सूक्ष्मदर्शकयंत्रांतून पा. हिले, तर ती सर्व निरनिराळ्या प्रकारची झाडे आहेत असे दिसून येते. आपल्याला दिसणाऱ्या वृक्षांमध्ये जशा नारळ, पेरू, फणस, वड, पिंपळ इत्यादि जाति आहेत, तशाच बुन्यांच्या झाडांतही अनेक जाती आहेत. पुस्तकावर जो बुरा येतो, त्याच्या डाहळ्या लिंबाऱ्याच्या डा. हळ्यांसारख्या असतात. आणि त्याचे मधील खोड लिंबायाप्रमाणेच सुळसुळीत असते. त्यास फळे फुलें कांही नसतात. पण भाकरीवर जो बुरा येतो, त्याची झाडें हुबेहुब नारळीसारखी असतात. त्याच्या खोडावर नारळीप्रमाणे खवले असतात. त्यांच्या शेंड्यास पातीपातीप्रमाणेच पाने असून शिवाय त्यास नारळासारख्याच फळांचे घोंसच्या घोंस लागलेले दृष्टीस पडतात! ही फळे अगदीं वाटोळी गरगरीत असून त्यांच्यावर कठीण कवच असते. दुसन्या कितीएक जातींच्या बुऱ्यामधील झाडांस निरनिराळ्या प्रकारची फुलें गजबरलेली असतात. कि