________________
अंक ६ वा. जून १८९८. नासा होतो. परंतु कित्येक प्राणी अशा शक्तिमान् डोळ्यांचे आहेत की, तसला प्रकाशही ते पाहू शकतात. तसेंच, प्रकाशलहरी जर अगदी मंद असल्या तर प्रकाश आझांला दिसणारच नाही. पण तो पहाणारे मांजर, घुबड इत्यादि प्राणी आहेतच. आमच्या दृष्टीचा पल्ला हा प्राणलहरीचा एक थर आहे. उदाहरणार्थ हे वातावरण घ्या. ह्याचे थरावर थर रचलेले आहेत. परंतु पृथ्वीच्या जवळजवळचे थर वरील थरापेक्षा अधिक अधिक घन आहेत. आपण जर वर वर जाऊं लागलों, तर वातावरण अधिक विरल होत गेलेले दिसते; किंवा समुद्राचे उहाहरण घ्या. आपण समुद्राच्या आंत आंत जाऊ लागलों, तर पाणी अधिक अधिक दाट लागू लागते, आणि जे प्राणी समुद्राच्या तळीं रहातात, ते वरती येऊ शकत नाहीत. आले तर, त्यांचे फुटून तुकडे तुकडे होतील. __समजा की, प्राणाच्या सत्तेखालच्या चैतन्यांत हे सर्व ब्रह्मांड ईथरचा समुद्र आहे, आणि त्या चैतन्याचे पायरीपायरीने दाट पातळ असे थरावर थर आहेत. अधिक बाहेरचे जेवढे थर आहेत, तेवढे विरळ विरळ आहेत आणि मध्याच्या जवळजवळचे थर जाड जाड होत गेले आहेत. एक एक चैतन्याचा जुडगा एक एक थर बनलेला. समजा की, सबंध वस्तु हे एक वर्तुळ, आणि परिपूर्णता हा त्याचा मध्यबिंदु. मध्यबिंदूच्या पुढे पुढे आपणाला अधिक जड जड हेलकावे आढळतात. जड तत्व हे अगदी बाहेरचे कवच; मन आणि आत्मा हा मध्यबिंदू. नंतर कल्पना करा की, ह्या दृश्य शृंखला कापून त्यांचे थर केले. एक एक थर लक्षावधि मैल लांबीचा,असून एकजातीच्या चैतन्याचा आहे. आणि तसाच त्याच्यावर दुसरा त्याहून उच्च प्रतीच्या चैतन्याचा तसाच लक्षावधि मैल; ह्याप्रमाणे सारी रचना आहे. ह्यावरून हे खचित आहे की, एका जातीच्या चैतन्यांतील प्राणी, एकमेकांस ओळखतील. पण त्याच्या खालच्या थरांतील किंवा वरच्या थरांतील प्राण्यास ओळखता येणार नाही. तरी दुर्बिणीने आणि सूक्ष्मदर्शक यंत्राने आझाला आमची दृश्यशक्ति वाढविता येते. आणि उच्च प्रतीच्या चैतन्यांतील किंवा नीच प्रतीच्या चैतन्यांतील शोध करता येतो. तसेंच प्रत्येक मनुष्याला स्वतःला उच्च प्रतीच्या चैतन्यांची किंवा खालच्या प्रतीच्या चैतन्यांची स्थिति आणता येते, आणि त्यांत काय चालले आहे, तेंही जाणतां येते. कल्पना करा की, ही खोली आपल्याला दिसत नाहीत अशा प्राण्यांनी भरलेली आहे. ते एका विवक्षित चैतन्याच्या प्राणांची स्वरूपे आहेत. आणि आझी दुसऱ्या चैतन्याच्या प्राणांची स्वरूपं आहोत. कल्पना करा की, ते अधिक बु.