Jump to content

पान:केरळ कोकीळ.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. जून १८९८. १२३ आले. परंतु अरिस्टॉटल, प्लिनी वगैरे तत्त्वज्ञान्यांनी आपल्या हयातीत ढेकूण असल्याचे लिहिले आहे. तरी येवढें खचित की, पंधराव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत इंग्लदामध्ये मात्र ढेकूण कसले ते माहित नव्हते. एक प्रसिद्ध प्रवासी स्प्यानिश प्राणिशास्त्रवेत्ता अझारा ह्या नांवाचा होऊन गेला. त्याने असे सिद्ध केले आहे की, रानटी स्थितीमध्ये ढेकणांस मनुष्याचे रक्त पिण्याचे माहित नसते. आणि त्यावरून त्याने असे अनुमान काढले आहे की, मनुष्यप्राणी निर्माण झाल्यानंतर बहुत कालाने ढेकणांची उत्पत्ति झाली असावी. मनुष्यांची शहरें, समाज वगैरे जमू लागल्यानंतर ढेकूण झाले असावेत. आमच्या प्राचीन मताप्रमाणे ढेकणांची गणना खेदज प्राण्यांमध्ये आहे. घामापासून उत्पन्न होणारे जे प्राणी, त्यांना खेदज असें ह्मणतात. परंतु ते होतात कसे, हे पहाण्यास मिळत नाही, व त्याबद्दल कोठे उल्लेखही केलेला आढळत नाही. ढेकणाला मनुष्याच्या रक्ताशिवाय दुसरा कोणताही भक्ष्य नाही. तो अतिशय भुकेला ह्मणजे मग कोणत्याही प्राण्यावर हल्ला करतो. परंतु मनुष्याइतकी पातळ त्वचा कोणत्याच प्राण्याची नसल्यामुळे, त्यास त्याचा फारसा उपयोग होत नाही. ढेकूण जितका अधाशी आहे, तितकाच तो सोशीकही आहे. कधी कधी एक किंवा दोन वर्षेही तो भक्ष्यावांचून राहूं शकतो! ही अद्भुत गोष्ट पृथ्वीवरील इतर कोणत्याही प्राण्यांत आढळणार नाहीं!! * ज्या घरांत मुळीच ढेकूण नाहीत, असें घर बहुधा विरळाच. ह्यास्तव त्यांचा उपद्रव दुःसह झाला ह्मणजे त्यांच्या नाशाला निरनिराळे लोक निरनिराळ्या उपायांची योजना करतात. तरी भिंतीच्या व लाकडाच्या फटींतून, कागदाच्या रुमालांतून त्यांस हाकून लावण्याचे काम कठीणच असते. साधारणपणे तीक्ष्ण दर्पाने हे प्राणी मरतात. ह्यास्तव

  • ही गोष्ट “ The Insect world " by Lonis Figuier ह्या पुस्त. कांत नमुद केलेली आहे. परंतु ती अशक्यशी दिसते. ग्लासामध्ये रात्री टाकून ठेवलेले ढेकूण दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मरतात हा अनुभव आहे. पण ते खाण्यावांचून मरतात, किंवा दुसऱ्या कशानं मरतात, हे काही खात्रीने सांगतां येत नाही.