________________
SAMS ११२ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. अशीच. गुलाबाच्या किंवा मोगऱ्यासारख्या नाजुक फुलांच्या हारांत मध्येच जर एखादें धोतऱ्याचे किंवा भोपळीचे फूल-तेंही फुलाच्याच जातीचें-झाडांपासूनच उत्पन्न झालेलें-येवढ्याच सबबीवर मध्येच खुपसून दिले, तर त्या हाराची शोभा काय विचारावी ! हार करतांना दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्ष्यांत ठेविली पाहिजे. ती ही की, फुलें गुंफतांना त्यांच्या आंगास ढका लावतां कामा नये, त्यांचे अवयव-पाकळ्या-छिन्नविच्छिन्न होऊन त्यांतील मुळचे सौंदर्य व सुवास कमी होता कामा नये. नाहीतर नुसत्या फुलांपेक्षां हारामध्ये सौंदर्य वाढावयाचे एका बाजूस राहून उलट विद्रूपता मात्र यावयाची. फुलें आधी हाताने पायाने चुरमुडून मग ती ओवली, किंवा ती उभी आडवीं कशीतरी ओवली तर उपयोग काय ? किंवा मोगऱ्याच्या फुलांमध्ये गुलछबूची पुष्पं नीट रीतीने बसविण्यासाठी लाब होतात ह्मणून त्यांच्या पाकळ्या छाटून काढल्या तर त्या हाराची बहार काय विचारावी ? हीच सावधगिरी शब्दांसंबंधाने काव्यांत ठेवावी लागते, आणि त्यांतच कवीची कुशलता दृष्टोत्पत्तीस येते. .. प्रस्तुत काव्यांत विशेषेकरून ह्या शब्दरचनेच्या संबंधाने अतिशयच हेळसांड झालेली आहे. हे कळविण्यास मोठी दिलगिरी वाटते. खर झट ग्रंथकर्ते रावसाहेब हे ट्रेनिंग कॉलेजासारख्या महाविद्यालयावर मुख्याध्यापक आहेत. तेव्हां मराठी काव्यांशी त्यांचा चांगलाच परिचय असला पाहिजे; व्याकरणशास्त्र त्यांस उत्तम अवगत असले पाहिजे; ते स्वतः रासक असल पार अलंकारशास्त्राची व शब्दशास्त्राची त्यांस विशेष माहिती असली पाहिजे. असें असता त्यांच अपत्य राजबिंडें कां निपजूं नये ? तें तर विद्रूप व अशक्त निपजले आहे. असें कां ? ह्याबद्दल काही कल्पना चालत नाही. । अहिल्याचरितकाव्याची स्फूर्ति, प्रस्तुत कवीस मयूरपंतांच्या केकावलिस्तोत्रावरून झाल्याचें, 'पृथ्वीवृत्ता'वरून व शेवटी 'मयूरसुत याचितो' ह्या त्यांनी घातलेल्या संकेतावरून स्पष्ट होत आहे. पण तो भक्तिरसाने थबथबलेला, भाषणचातुर्याने पक्कदशेस आलेला, शब्दसाहित्यानें रंगास चढलेला द्राक्षांचा घोस कोणीकडे, आणि हा आंबट, चिकाने भरलेला, अर्धकच्चा करवंदांचा घड कोणीकडे ? दोहोंत साम्य झटले तर अंजीर आणि उंबर इतकेंच आहे. ह्या काव्यांत काठिण्य हा दोष प्रमुखत्वेकरून भरलेला आहे; आणि तो विशेषेकरून शब्दाथांच्या विपर्यासामुळे आणि रूपाच्या बेरूपामुळे किंवा मनसोक्त दडपादडपीने आलेला आहे; आणि आमच्या मते हा दोष तर कविप्रसादास केवळ प्रतिकूल