________________
मोरोपंतकृत भैले ने वरिति स्तुतिप्रति; न जोडिती पाप ते । भोक्ता असल्यामुळे त्याला येथे त्या कन्यांचा पति म्हटले आहे. भगवंताला 'कवीश्वरमनः सुतेचा पति' म्हणण्यांत कवीने आणखी एक गोष्ट सुचविली. कविजनांनी एक भगवंताची मात्र आपल्या काव्यांत स्तुति करावी, इतरांची करूं नये, हा कवीचा इंगितार्थ. ह्या केकेंत 'स्तुतीस परमेश्वरच योग्य' ह्या व्यंग्यरूप अर्थाला प्राधान्य दिले आहे म्हणून ही उत्तम काव्यांत गणनीय आहे. काव्याचे प्रकारः-उत्तम, मध्यम व कनिष्ठ असे तीन आहेत. ज्यांत व्यंग्यार्थाला प्राधान्य असते तें उत्तम काव्य, ज्यांत व्यंग्यार्थ अप्रधान किंवा गौण असतो त्या काव्यास मध्यम किंवा गुणीभूतव्यंग्य म्हणतात. ज्यांत व्यंग्य स्पष्ट नसून केवळ शब्द अथवा अर्थ मात्र चमत्कारिक असतात, तें काव्य कनिष्ठ किंवा अव्यंग्य म्हणावें. केकावलीतील पुष्कळ श्लोक व्यंग्य काव्याची सुरेख उदाहरणे होत. कविश्रेष्ट मोरोपंत यांचा काव्यरचनोद्देशः-ज्ञानेश्वरतुकारामादि महाराष्ट्रांतील अर्वाचीन संतमंडळीनें भगवद्वर्णनपर मात्र कविता रचावयाची असा जो नियम घालून दिला त्यास अनुसरूनच वामन-मोरोपंतांनी कालिदासाच्या रघुवंश-मेघदूतांसारखी स्वप्रतिभाद्योतक स्वतंत्र प्रकरणे न रचितां, भगवत्स्तुतिवर्णनपर अशा भारत-रामायणादि प्राचीन ग्रंथांवरच काव्यरचना केली. पंतांची बहुतेक स्फुटप्रकरणे ही ईशस्तवनपरच आढळतात. यावरून आपल्या ह्या कवीने यशःप्राप्त्यर्थ आपली कविता रचिली नसून केवळ स्वोद्धारार्थच ती रचिली असें स्पष्ट दिसते. पंतांनी आपल्या काव्यांत जागोजागी अशा आशयाचे उद्गार काढिले आहेत. त्याची ठळक उदाहरणे: भारताच्या आरंभी व शेवटी पंत म्हणतातः-(१) 'हरि ज्यांचा कैवारी त्या पांडुसुतांसि वंदितों भावें। वाटे चरित्र त्यांचे कांहीं आपण तरावया गावें' (आदि.), (२) 'ज्यांच्या गानें व्हावे प्रेमाश्रुक्षपितचंदन मयूरें । आर्या समर्पिल्या हरिचरणीं श्रीरामनंदन मयूरें' (स्वर्गारोहण २०,५५), मंत्रमय भागवताच्या अखेर पंत लिहितातः (३) 'मंत्रमय रचुनि भावें, भागवता नमुनि देवदेवा, हे । तुलसीच रामनंदन सेवा ऐसीच देव दे वाहे' ॥ १०९ ॥ रामरीतींतील उद्गारः-(४) 'सद्व्यसनी वेंचावे आयुष्य, नसेचि भरंवसा याचा । झालों जीर्ण तरि मनी आहे रसिकांत भर वसायाचा' ॥ ६७ ॥ (५) 'त्वत्प्रीत्यर्थ तव सगुणमयचि करुनि कवन वेंचितों देहा । उत्साह त्वत्कीर्तनरस चित्ता नवनवेचि तों दे हा' ॥ ६८ ॥ भस्मासुरआख्यानाच्या शेवटीं-(६) 'श्रीशाने संकटातें हरुनि सकरुण मुक्त केला गिरित्र । संसारारातिभीतिप्रति परिहरितें हैं हरीचें चरित्र । गातां आकर्णिताही भवभय शमवी यास्तव स्वादरानें। भावार्थे गाइलें हो सदुदितरत जो त्या मयूरेश्वराने' ॥ ४२. अशी अनेक स्थळे शोधकांस पंतांच्या काव्यांत सांपडतील. त्यावरून स्वोद्धार हाच पताच्या कवित्व रचनेचा मुख्य हेतु असून कीर्तिलाभ हा अगदीच गौण हेतु असला पाहिजे हे मार्मिक वाचकांस दिसून येईल. १. शहाणे लोक, साधुपुरुष. २. वरित नाहीत. अंगीकार करीत नाहीत. ईश्वर आमचा पिता. त्याची स्त्री स्तुति ही आमची माता झाली, तेव्हां तिचा आम्ही स्वीकार कसा करावा अशा शंकेने साधुलोक स्तुतीचा अंगीकार करीत नाहीत. पुढील वरील विचाराशी बरेंच समानार्थक आहे:-'अद्यापि दुर्निवारं स्तुतिकन्या वहति कौमारं। चिते साऽसन्तोप्यस्यै न रोचन्ते ॥ ३. पापाची सांठवण करीत नाहीत,