पान:केकावलि.djvu/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. हैरापरिस तूं बरा प्रेभुवरा! सदा जो पिशी असा रस समर्पित्या अमृत आपुलें ओपिशी. ॥ ३१ १. शंकरापेक्षा. 'पेक्षां' व 'परिस' (परीस) या अव्ययांमध्ये तुलनेचा अर्थ आहे. येथें प्रभु आणि शंकर यांची तुलना केली असतां विष पचविण्याच्या कामी प्रभु जास्त आहे असे समजावें. 'हरः स्मरहरो भर्गख्यंबकस्त्रिपुरांतकः' इत्यमरः. २. प्रभुश्रेष्ठा! सर्व देवांत अत्यंत श्रेष्ठ असा जो तूं त्या! शंकर एकदा मात्र विष प्याले, तूं नेहमी स्तुतिरूप जलाल विष पितोस म्हणून शंकरापेक्षां तूं बरा असें मी म्हणतों. तुला रोज रोज हे स्तवनविष बरें पचतें, अर्थात् शंकरापेक्षां तुझा अधिकार मोठा होय. येथे कवीनें प्रभुकडे जो बरेपणा दिला आहे तो प्रभु विषप्राशन नेहमी करणारा आहे म्हणून दिला आहे. महादेव हें नाम शंकरापेक्षा आपणास जास्त अन्वर्थक आहे ह्या उद्देशाने भगवंताला 'प्रभुवरा' असे संबोधन केले आहे. विष्णु हरापरिस बरा म्हणूनच प्रभुवर. ३. स्तुतिरूप विष. ४. दूध, मोक्ष अथवा देवाचें पेय. ५. असा रस (स्तवनविष) समर्पित्या (समर्पण करणाऱ्याला, देतो त्याला, दात्याला) [तूं] आपुलें (स्वतःच्या मालकीचें) अमृत (प्रसिद्ध सुधानामक देवपेय, किंवा मोक्ष) ओपशी (देतोस). जो भगवंताला स्तवनरूप विष अर्पण करितो त्याची फेड भगवान् सुधा किंवा मोक्ष देऊन करितो. भगवंताचें स्तवन करणारांस सुधा प्राशन करावयास मिळून अमरत्व (देवत्व) प्राप्त होते असाही अर्थ करावा. ह्यांत 'अमृत' शब्दावर कवीने श्लेषयोजना केली आहे. पहिल्या अर्थाच्या योजनेंत अपकार करणाऱ्यावर देव उपकार करितो असे सांगून भगवंताचें अपरिमित दयाळुत्व सुचविले आहे. हे पंतांचे काव्य अल्प प्रमाणावर पंतांच्या कवितेंतील गुणदोषांचे उत्तम द्योतक आहे. कवीचें निरंकुशत्व, बेताबाताची श्लेषप्रियता, लांब समास, यमकप्रियता, संस्कृत वाक्यांश व संस्कृत तन्हची वाक्यरचना, परभापेंतील शब्दयोजना, सरस अनुप्रास, एकंदरीत काव्यालंकारांची आवड, सुभाषितांचा भरणा, प्रौढ व मार्मिक शब्दयोजना, भक्तिरसाचा अपूर्व मेवा वगैरे कित्येक गोष्टींची यांत ओळख पटते. (१) रावबहादुर रानडे मराठी ट्रान्सलेटर असतांना त्यांनी डिसेंबर १८६४ च्या अखेरपर्यंत प्रसिद्ध झालेल्या मराठी ग्रंथांचे संक्षिप्त विवेचन केले आहे. त्यांत ते ह्मणतात:-Tukaram's मानसपूजा and Moropant's केकावलि arre merhane the best specimens of their writings.' (Catalogue of Native publications of the Bombay Presidency upto 31st December 1864 Preface.) (२) प्रसिद्ध 'निबंधमाला'कार कै. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा अभिप्रायः-'ज्या कोणास मोरोपंताच्या कवित्वगुणांची थोडक्यांत परीक्षा कर्तव्य असेल त्याने 'केकावली' काव्य पहावें. ते हाती घेतले असतां कालिदासाचे गुणसर्वस्व जसे 'मेघदूतां'त आढळणारे आहे, जगन्नाथाच्या वाणीचें रससर्वस्व जशी 'गंगालहरी' प्रकट करते, त्याप्रमाणेच वरील केकारवही प्रस्तुत कवीच्या गुणां. विषयी निर्णायक होईल' (निबंधमाला अंक ६३ पृ० ६). अमृत ह्या एका शब्दावर ३१,९०,९१,१०४,१०५ अशा पांच केकांत श्लेषयोजना केलेली आढळते. ६. ओपिता ८ मो० के०