Jump to content

पान:केकावलि.djvu/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७३ केकावलि. जनीं तरि असें असे, शिशुहि जे मुखें वर्ण वी, पिता पिउँनि ते भुले, मधुरता सुखें वर्णवी। २6 दुर्भगः पुमान् । पंगुः शृंगं समुत्तुंगं मेरोरारोढुमिच्छति ॥ १७० ॥ [मंदारमरंदचंपू-पृ० १४२.] 'जरि वर्णनीय अर्थों वयंप्रतिबिंब अर्थ कवि वदती । तें ललित; गेलिया जळ बांधाया सेतु इच्छिते सुदती' ॥ (अ० वि०). याची अन्य उदाहरणे:-(१) कोणी हे तुज कथिलें चक्षुविषनागपुच्छ तुडवाया । दाटुनि कां करिसी गा! रामाशी वैर, वंश बुडवाया ? ॥ [मोरोपंतवनपर्व-अ० ११ गी० १३], (२) अवलंबिला तव सुतें भीष्माब्धि तरावयासि हा प्लव गा! । मारुतिभंग घडेल प्रचुर चणकचर्वणोद्धता प्लवगा. ॥ [मोरोपंत-उद्योगपर्व-अ० ४ गी० ३७ पृ० ५७], (३) कृष्ण म्हणे, ‘राया ! तूं उचित अनुद्धत न उद्धृत क्रतुला, । योग्य न दुग्धस्थानी योजाया प्रियहि शुद्ध तक तुला. ॥ [सभापर्व-अ० २ गी० ९], (४) कोठे वंश रवीचा, कोठे मति अल्प जाण ती माझी । मोहें उतरूं पाहें होडींत अपार सागरामाजी' ॥ (रघुवंशप्रस्तावना-भाषांतर.) १. जनीं तरि असें असे (आहे) [कीं] शिशुहि मुखें जे वर्ण वी, ते (वर्ण) पिउनि पिता भुले [आणि] गुरूक्तहि प्रायशा कटु [असें शिशु] म्हणे [आणि तें गुरूक्त त्या शिशूच्या] जरि मना न ये तरी त्या वर्णांची] मधुरता [लोकांकडूनही सुखें वर्णवी (वर्णवितो) [अहो!] दयानिधि ! तुम्हांपुढे अशा जनकथा कायशा [सांगाव्या?]असा अन्वय. हे दयाघना! मी जी आपली वेडीवाकडी स्तुति करीन तिचें तुम्ही कौतुक मानून घ्या, अशा अर्थाने लोकव्यवहार दाखवीत कवि म्हणतात. जनीं लोकांत. २. लहान मूल. ३. शब्द. ४. वितो, उच्चारितो, तोंडाबाहेर काढितो. 'विणे' या धातूचा पंतांच्या काव्यांत जो प्रयोग आढळतो तो ध्यानात ठेवण्यासारखा आहे:-(१) विराटपर्व-अ० ५ गी० २२; (२) विराट-अ० ५ गी० २७; (३) विराट-अ० ३ गी० ५१; (४) विराट-अ० २ गी० ६९ इत्यादि स्थळे पहा. लोकांत तर अशी रीत आहे की लहान मूलही जे शब्द तोंडावाटे काढते त्यांतें श्रवण करून बाप मोहित होतो. ५. बाप. 'पा' धातूपासून पितृ (पिता) शब्द निष्पन्न झाला. पालन करितो तो पिता, पाति (रक्षति) इति पिता. 'रक्षणाच्च पिता नृणाम्' अथवा 'स पिता यस्तु पोषकः । रक्षणादि कारणांनी जे पितृत्व पावतात त्यांचा निर्देश भारतांत आणि इतर ग्रंथांत आटोर असाः-'शरीरकृत् प्राणदाता यस्य चान्नानि भुंजते । क्रमेणैते त्रयोऽप्युक्ताः पितरो धर्मशासने. ॥१॥ कन्यादातान्नदाता च जन्मदाताभयप्रदः । जन्मदो मंत्रदो ज्येष्ठभ्राता च पितरः स्मृताः ॥' 'जनकश्चोपनेता च यश्च विद्यां प्रयच्छति । अन्नदाता भयत्राता पंचैते पितरः स्मृताः ॥ ६. प्राशन करून. ते (वर्ण) पिउनि-ते शब्द सादर श्रवण करून. वर्ण पिणे शब्द आ. दरपूर्वक ऐकणे. पिता वर्ण पितो-या वाक्यांत वर्ण हे प्रस्तुत आणि त्याचे प्रतिक ( अमृत अप्रस्तुत होय. वर्ण ऐकावयाचे आणि अमृत प्राशावयाचे असे असता योग्यत्व वर्णावर आणिले. अशा ठिकाणी इंग्रेजीत Transferred epithet .. समजतात. वर्ण व अमृत यांचा अभेद मानून अप्रस्तुताच्या धर्माचा आरोप ७ मो० के०