Jump to content

पान:केकावलि.djvu/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. समासघटित आहेत. त्यांचा प्रारंभ असाः-रविवंशजदशरथनृपसंतानक्षीरसिंधुचंद्राचा । गाधिजमुनिमखनाशनराक्षसमथनक्रियावितंद्राचा ॥ हा प्राकृतसंस्कृतमिश्रणाचा प्रकार कित्येकांस दोषावह दिसतो, त्याविषयीं हंसांचा अभिप्रायः-"मोरोपंताची वाणीच ओजोगुणविशिष्ट आहे. तीत चार चार पांच पांच पदांचे समास अतिशय. कोठे कोठे तर आयेंचे दोन दोन चरण भरून एकेक समास असेंही आढळते. त्याच्या काव्यांत संस्कृत शब्दांचा भरणा अतिशय; कोठे कोठे आयेंचे चतुर्थीश, आर्यार्धे किंबहुना संपूर्ण आर्याही शुद्ध संस्कृत भाषेतील प्रकृतिप्रत्ययांनी जोडलेल्या आढळतात. ज्या ठिकाणी अप्रसिद्ध संस्कृत शब्द न घालतां प्रचारांतील संस्कृत अथवा प्राकृत शब्दांची योजना करितां आली असती अशा ठिकाणीही पंतानें यथेच्छ संस्कृत ओतून दिले आहे. ह्या गोष्टीचे अर्वाचीन विद्वानांपैकी कितीएकांस नवल वाटते. व ह्याच कारणामुळे ते पंतांस नांवें ठेवितात. परंतु ही त्यांची चुकी आहे असे म्हटल्यावांचून राहवत नाही. कारण प्राकृत भाषाकवितेंत हा विचित्र प्रकार अवलोकन करून इतर भाषांतील लोकांस कदाचित् आश्चर्य वाटले तर वाटो. पण मराठी भाषाभिज्ञांस ह्याचे आश्चर्य मानतां येत नाही व याच कारणामुळे मोरोपंतास अरसिक इत्यादि नांवें ठेवितां येत नाहीत. प्राकृत कवितेंत संस्कृत शब्दांचें मिश्रण करून काव्य लिहिण्याचा परिपाठ, आद्यकवि मुकुंदराज याजपासून तो मोरोपंताच्या पूवीपर्यंत जितके कवी झाले त्या सर्वांचा दिसून येतो. त्यांत कोठे कोठें कवीच्या विद्वत्तेप्रमाणे आणि कवितेच्या विषयाच्या महत्वाप्रमाणे भाषामिश्रणांत संस्कृताचे न्यूनाधिक्य आढळून येतें. परंतु ते अगदीं नाहीं असें कोठेही दिसत नाही. यावरून मोरोपंतानें काढिलेला मिश्रणाचा प्रकार अपूर्व आहे व यामुळे तो दोषास पात्र आहे असे म्हणता येत नाही. लांब लांव समास पुष्कळ ठिकाणी घातल्यामुळेच पंताच्या काव्यांत ओजोगुण आला. लांब लांब समास संस्कृत भाषेखेरीज व्हावयाचे नाहीत, तेव्हां ओजोगुणवृद्ध्यर्थ संस्कृताचे मिश्रण पंतांस विशेष करावे लागले. व त्यापासून ओजोगुणवृद्धिही झाली. असें असतां, हे गीर्वाणमिश्रण कांहीं अर्वाचीन पंडितांच्या दृष्टीने दोषप्रद झाले हा त्यांचा दृष्टि दोपच समजावयाचा. वस्तुतः मोरोपंताची कविता अथवा प्रबंधरचना वाचीत असतां संस्कृतसमासघटितशब्दसमुदायश्रवणापासून चित्तास अवर्णनीय आनंद होतो. आणि त्या योगें मनाची विस्तीर्णता, उदात्तता व उदारता वाढत जाऊन क्षणभर संसारदुःखाचाही विसर पडतो. असा पंताच्या कवितेचा पाक उतरला आहे असे आम्हांस वाटते. ज्यापक्षी सर्वच प्राचीन कवींनी गीर्वाणशब्दशर्करेचा प्राकृत दुधांत संमिश्रणाने उपयोग केला आहे व पंतानें तर तो इतक्या कुशलतेने केला आहे की, त्यापासून गुणवृद्धिच झाली; त्यापक्षी यासंबंधाने मोरोपंतास दूषण देणे अलाव्य होय. आतां मोरोपंत प्राचीनांच्या चालीला अनुसरला यामुळेच त्याच्या संस्कृतमिश्रणास दोष नाही, किंवा ते मिश्रणच स्वतः अदोषरूप किंबहुना उलटे गुणसंपन्न आहे, याचा आपण तत्वतः विचार करूं. संस्कृतभाषाभांडारांत अनंत शब्दरत्रे सांठवली असून ते भांडार सुखनिरूपही झालेले आहे. त्यांतून पाहिजे तेव्हां सूत्र लावून खणून आणखी नवीं नवीं असंख्य शब्दरत्ने काढितां येतात. ही शक्ति प्राकृत भाषेतच काय, पण पृथ्वीवरील कोणत्याही भाषेत नाही असे म्हटले तरी चालेल. अशा संस्कृताचा प्राकृताशी जनकजन्यसंबंध अतिप्रसिद्ध आहे. प्राकत भारत