Jump to content

पान:केकावलि.djvu/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उपयुक्त व उदात्तविचार भरपूर आढळतात. 'केकावली'च्या वाचकांस त्यांचा उत्कृष्ट परिचय होतो. त्यांपैकी काहींचा निर्देश आही पुढील सदरांत केला आहे. (८) उत्कृष्ट स्थळे. केकावलीच्या आरंभींचे मंगलाचरण फार सुंदर व अर्थपूर्ण असून त्यांत कवीने काव्याचे सार थोडक्यांत आणिलेलें आहे. २-या केकेंतील पतितांची नामावली, ४ थ्या केकेंत आपला स्वोद्धार अजून झाला नाही यावरून कवीला सुचलेले संशय, ५ वींतला कच्छ, वराह व कृष्ण या तीन अवतारांत भगवंतांनी केलेल्या महत्कृत्यांचा चटकदार उल्लेख, व ६,७ केकांत केलेले भक्तांवरील प्रभूच्या प्रेमाचे वर्णन या गोष्टी वाचकांचे चांगले मनोरंजन करितात. १० व्या केकेंत गंगेची भीति वर्णन करितांना पंतांनी स्त्रीस्वभावाचे सुरेख चित्र काढिले आहे. ११, १२,१३, यांतील रसास्वाद वाचकांना फार गोड वाटेल. १२ व्यांत सारालंकार अतिशय सुरेख वठला असून १३ व्यांतील अंतिम चरणांत गोवलेला दृष्टांत सहृदय वाचकांस आनंद देईल. २० व्या केकेंतील देवाच्या दयेचे वर्णन फार यथार्थ केले असून २२ व्या केकेंत सदाश्रमांत मला वास घडला आहे असे सांगण्यांत पंतांनी नाईकाच्या घरच्या आपल्या आश्रयाचा उल्लेख केला आहे. तसेंच २३,२६ या केकांत फार मार्मिक व्यावहारिक दृष्टांत योजिले आहेत. २७ त 'प्रभूचा महिमा ब्रह्मादिकांस अतयं, मग तो आह्मी कोठवर वर्णावा ?' असे सांगून 'भगवत्प्रार्थनेचा खरा हेतु सन्मति होणे' हा होय, हे सुरेख आध्यात्मिक तत्व गोंविले आहे. ३०-३२ ह्यांत एक परमेश्वर मात्र स्तुतीस योग्य आहे, इतरांना स्तुति शोभत, व पचत नाही हाणून सत्कवि आपल्या काव्यांतून भगवंताचीच तेवढी स्तुति करितात' असें कवीने प्रतिपादन केले आहे. ३४-३९ ह्या सहा केकांत कवीने भगवंतास आपल्या कवितासुतेचा स्वीकार करण्यास विनवितांना कृष्णावतारांतील व रामावतारांतील कथांचा उल्लेख केला आहे तो फार चित्तवेधक व बोधपर वाटेल. ह्यांत कवीने जो कोटिक्रम केला आहे, तो वाचकांस फार खुबीदार व निवडक शब्दांनी केलेला असून त्यांत देवाचे स्वभक्तविषयक प्रेम उत्तम रीतीने दाखविले आहे. यापुढील दोन केकांत प्रभूच्या सदयतेचे सुरेख वर्णन आहे. ह्या दोन श्लोकांतील विचार सर्व धर्मातील विचारी लोकांस पसंत पडतील इतके उदात्त आहेत. ४२ व्या केकेंत कवि भगवंतास शरण जाऊन कृतापराधांची क्षमा मागतात; त्यांत देवाला शरण जा तांना भक्ताच्या अंतःकरणांत त्याजविषयी ज्या वृत्ति उत्पन्न व्हाव्यात त्यांचे सुरेख १ प्रतिबिंब वठले आहे. ४४ व्या केकेंतील वैद्याचा दृष्टांत व्यवहारांतला असून फार स. , मर्पक आहे. ४५ व्या केकेंतील कूजित मधुर असून त्याच्या पुढच्या श्लोकांत केलेले वृद्धावस्थेचे वर्णन तर बहारीचे आहे. देवभक्तांचा संबंध माताबालकांच्या संबंधाप्रमाणे निकट आहे, असे ४९ व्या केकेंत वर्णन असून त्याच्या पुढच्या केकेंत कवीच्या भक्तीचा