Jump to content

पान:केकावलि.djvu/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३७) expresses, as by what it suggests; not so much by the ideas which it directly conveys, as by other ideas which are connected with them. He electrifies the mind through concluctors. The works of Milton cannot be comprehended or enjoyed, unless the mind of the reader co-operates with that of the writer.” ___पंतांच्या 'केकावली'तला हा सूचकपणा चांगला कळण्यास व त्यापासून मनरंजन होण्यास वाचकांस पुराणेतिहासांतील कथांची चांगली माहिती पाहिजे. ह्या छोट्याशा काव्यांत रामायण, भारत, भागवत, ब्रह्मोत्तरखंड, ब्रह्मवैवर्त, इत्यादि पुराणैतिहासिक ग्रंथांतील अनेक कथांचा उल्लेख झाला आहे. त्यांची माहिती झाली तरच त्या त्या केकांचे स्वारस्य वाचकांस कळून येईल. ख्रिस्ती शास्त्रांतील कथांची माहिती नसणारांस मिल्टनचे 'प्याराडाइज लॉस्ट (नंदनवन हरपलें) किंवा 'प्याराडाइज रीगेन्ड (नंदनवन पुनः मिळाले) ही काव्ये जशी गोड लागणार नाहीत व त्यांतील स्वारस्य त्यांना कळणार नाही, त्याचप्रमाणे पुराणेतिहासिक कथांची माहिती नसणाऱ्या वाचकांना 'केकावली'चा बराच भाग आवडणार नाही व त्यांतील स्वारस्य त्यांना कळणार नाही. केकावलीच्या सूचकपणाची उदाहरणे पाहाणे असल्यास केका २,५,७,८,१७,१९, २१,२४,३०,३४-३९,४२,५१,५४,५५,६२,६८,६९,७१-७४,७६,७७, ८०. ८८,९०,९१,१००,१०२-१०५,१०९,११२-११५ पहा. या कथांसंबंधी एक गोष्ट ध्यानात ठेवण्याजोगी आहे, ती ही की, या काव्यांत ईश्वराची वत्सलता, भक्तावरील त्याचे प्रेम, त्याची पतितपावनता, साधुपरित्राण, दुष्टजनशासन इत्यादि गुण वर्णन करितांना जेवढे दृष्टांत योजले आहेत तेवढे सर्व प्राचीन पुराणैतिहासिक ग्रंथांतून घेतले आहेत. इतर स्फुट प्रकरणांत अर्वाचीन संतचरित्रांतील कथांचा उल्लेख केला आहे; तसा प्रकार या काव्यांत केला नाही. (५) ईश्वराची ऐकांतिक भक्ति. ह्या काव्यांत तीर्थे व इतर देव यांचा अव्हेर करून पंत सर्वश्रेष्ठ अशा एकाच देवाला अनन्यभावानें शरण जाऊन आपल्या उद्धा. राचा सर्व भार त्यांनी त्याजवरच टाकिला आहे. यांत विष्णु व शंकर अशा दोन वांचा जरी उल्लेख केलेला आहे तरी ते भिन्न नसून एकरूपच आहेत असें केका ७१-७२ मध्ये कवीने फार सरसपणें वर्णिले आहे. 'जगद्गुरुमहेश्वरप्रभुशिरी नांदणारी, भगवचरणकन्यका भागीरथी देखील मला पतिताला पाहून भ्याली, इतर देवांच्या पायांशी डोके घासून घासून जरी त्याला घट्टे पडले तरी माझा उद्धार करण्यास ते समर्थ झाले नाहीत, मला आतां आपल्या पायाशिवाय इतर कोणी तारणारा उरला नाही, ह्मणून मी देवा! तुम्हांला शरण आलो आहे' असे म्हणण्यांत कवीने दरितति. मिरनाशाविषयीं तीर्थे व दैवते यांचे असामर्थ्य सुचवून, मुख्य देवाधिदेव परमेश्वराला अनन्यभावाने शरण जाण्यांत व त्याची ऐकांतिक भक्ति करण्यांतच पतितांचे खरें