Jump to content

पान:केकावलि.djvu/382

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सीताकांता! मेघश्यामा! हा दीन दास लक्षावा । रामा! अनुदिनिं वदनीं नामा वसवोनि नित्य रक्षावा. ॥ ५ ॥ (ओवी) सीताकांता ! मेघश्यामा ! । हा दीन दास लक्षावा रामा !। अनुदिनीं वदनीं नामा । वसवोनि नित्य रक्षवा. ॥ (आ)महाभारतः- मोरोपंती भारताच्या प्रत्येक पर्वाच्या पहिल्या गीतेचे आद्याक्षर घेऊन ती एकापुढे एक मांडिली असतां त्यापासून 'श्रीपांडवसहायोभगवानरविंदाक्षो जयति' असें वाक्य निष्पन्न होते. अशा रीतीने भारताच्या अठराही पर्वांची मोरोपंतांनी एक माळ बनवून पांडवांचा साहायकारी कमलनेत्र भगवान् श्रीकृष्ण यास ती अर्पण केली आहे. (इ)मंत्रभागवतः-यांत पंतांनी 'नमो भगवते वासुदेवाय' हा एकादशाक्षरी मंत्र प्रत्येक गीतेच्या आरंभीच्या अक्षरांनी साधिला आहे. (ई)मंत्रमयभागवतः-यांत प्रत्येक गीतींत 'नमो भगवते वासुदेवाय' हा एकाद शाक्षरी मंत्र साधिला आहे. याच्या एकंदर १०८ गीती (उपसंहारात्मक धरून १०९ आहेत. याची काही उदाहरणे कथानुरोधानें केकावलीच्या टीपांतून दिली आहेत. येथे त्याची तीन उदाहरणे रसिकांस मासल्याकरितां सादर केली आहेतः नतमोक्षद भवविधिनुत जगदीश वरेण्य वैनतेय-रथ । वाराया वसुधाभर देह धरी वासवादिगेयकथ. ॥१॥ नष्टां मोहुनि, भवनीं गवळ्याच्या तेज आपुलें राम । वाढवि, सुख दे वांटुनि नंदयशोदादिकां घनश्याम. ॥ २ न गमो चित्र भयद तम घन गर्जित वर्ष तेथ शेष वरी। वारिधि तशी सुखें दे वाटहि यमुना, न मार्गविन्न करी. ॥ ३ ॥ ..... (उ)कृष्णविजयः-बळराम ब्रह्महत्याक्षालनार्थ तीर्थयात्रा करित करित वेंकटाचळ पर्वतावर आला. तेव्हांचे वर्णनः पावनांघ्रि भला गावें । सुधाकदघटामळा । ज्यास तो चपळालभ्य । पावला वेंकटाचळा. ॥ (कृष्ण. ७९,१७) वरील श्लोकांत जी जाड टाइपाने अक्षरे छापिली आहेत त्यांनींच चवथा चरण होतो. (स्फट काव्ये:-पंतांनी क्वचित् आपल्या काव्यांत बंधही साधिले आहेत. त्यांचे ठळक उदाहरण त्यांचें 'अम्लानपंकजमालाबंधपंचक' काव्य होय. मोरोपंती स्फुटकाव्ये भाग १ ला, पृ० २२४-२२५ त तें काव्य व बंधरचना दिली आहे. याचे एक उदाहरण: दाता धाताविता त्वं गृह इह गहने लोकशोकनकर्मा । दीनानां नाथ नान्यो हृतनतपतन स्त्वां विना विश्ववित्तं ॥ मायेशाये न ये त्वामनु ननु मनुजास्तैः कृतं कृत्स्नकृत्यं । वागविद्यावित्तविघ्नैर्बत ! हतमतयो राम ! वा मद्यमत्ताः ॥ १॥