पान:केकावलि.djvu/341

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३४) (इ) मंत्ररचनेत अडचण पडते ह्मणून वर्णनसंक्षेपः. वानावीं पाताळें सप्त बळि श्रीअनंत वानावे । परि मंत्रवर्ण अडविति; आदरिले गुरु कसे न मानावे ? ॥१७॥ (मंत्रभा. ५.६२) खुबीदार वर्णनसंक्षेपःज्या पापें सुरवानरकृतघनजयरव मुहूर्त लोपविला,। खळदारविलापरवा कां वर्णिल कवि मयूर कोपविला? ॥ १८ ॥ (वनपर्व १२-८०) त्याच्या दक्षिणपार्थी अश्वत्थामा, पुढे कृप, द्रोण । दुःशासनादि बहु खळ होते, आर्यात योजितो कोण ? ॥ १९ ॥ (विराट. ६-२२) श्रोते हो! वर्णावें किति ? मज गप्पी असें वदाना की ? । स्वल्प उपप्लव्यपुरीं उत्सव, बहु होय हो तदा नाकी. ॥ २० ॥ (विराट. ७-३५) खळकृतगुरुनिंदेतें वर्णील कधीं न विस्तरें सुकविः ॥ की ती श्रीगुरुभक्ति प्रेमामरपादपांकुरा सुकवि. ॥ २१ ॥ (विराट. ४-१७) रावणसा बहु विनवी प्रेम प्रत्यक्षरीहि नव दावी। कीचक नीच कलुषनिधि त्याची आर्यात गोष्ट न वदावी. ॥२२॥ (विराट. १-४७) देवाच्या की गाती तद्भक्तांच्या यशास नर; कां तें। हर्षद सोडुनि, वणू तापद जे त्यां कशास नरकातें ? ॥ २३ ।। (मं. भा. ५.६४) (उ) अतिसंक्षेप. आख्यानाचे आख्यान किंवा दोनचार आख्याने एकाच गीतींत आटोपल्याची थोडी उदाहरणे: क कृषीवळ—पीडित दुर्बळ वृष पाहतांचि महिवरती, । ख्याता सुरभी देवी स्नेहें झाली उदंड गहिवरती. ॥ २४ ॥ (वन. १-६०) तो ब्राह्मणमाहात्म्य क्षत्रियमाहात्म्य त्यासि आयकवी;। वर्णी पतिव्रतेचे माहात्म्यहि सर्व योगिराय कवी. ॥ २५ ॥ (वन. ६-५५) धर्मव्याध स्कंदप्रभवादि कथा उदंड तो बोले; . श्रवणें धर्म ब्राह्मणगण नारद फार देवही डोले. ॥ २६ ॥ (वन. ६-५६) सांगुनि निजवृत्त, तिचे वृत्त पुसे तीस कोटिक विहितसें। स्वल्पांत तीहि सांगे बोलों शकती न कोटि कविहि तसें. ॥ २७ ॥ (वन. ९.५) तसंच आदि. ८,५६, ९-१; २७-२६; सभा. १-११; २-२४, २-३९; वन. ११ ५-३; ५-१२, ५-७२; १२-७९, १३-७२; अश्व. ५-१२८; विराट. ४-९७; उद्योग. २-१, ३-७३; ३-९५; ४-१७; कृष्ण. अ. ७०; ८५-४९; ८८-८५; मंत्रभाग. ४-१०७, ५-६ ५.६३; ८-१५४; ९.३६९-३७०; १२-८०; पहा.