Jump to content

पान:केकावलि.djvu/339

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ३२ ) तसेंच २७-२९ श्लोकांतील मदिरापानाचे व भगवत्कीर्तिपानाचे वर्णन कसे सुरस झालें आहे त्याचा थोडासा मासला पहाः लज्जा, गेहकुटुंवधर्मरुचि, भी देहस्मृतीही गळे, आधी हांसति वाळ कर्मठ भले, होती तयां वेगळे। ताडी शब्द विचित्र अश्रु नयनी, पुण्यर्धि सारी ढळे । कां पीती मदिराची मूर्ख भगवत्कीर्ति प्रिया नाढळे ? ॥ ६५-२७ देहातें विसरे, न मृत्युस गणी, हांसेहि, नाचे, रडे, लज्जा जाय, नुरेहि रीति पहिली, अन्याचि अंगीं जडे, । हे पानव्यसनी असे सुख, तरी तें कीर्तिपानी घडे, पायीं विश्व पडे, न जाय नरकी, कां मद्यप्या नावडे ? ॥ ६५-२८. अ० ६९ श्लो० २६; अ० ७१ श्लो० ९, १२, १४, १५ ह्यावरून, पंतांचे रचनाचातुये व कल्पकता हे गुण चांगले दिसून येतात. अ० ७१ श्लो० १९-२७ हे नऊ श्लोक पंतांनी मूळांतील एका (२१ व्या) श्लोकाच्या आधाराने रचिले आहेत. त्यावरून त्यांची विस्तारप्रियता दिसून येते. तसेंच कृष्णविजयांत पंतांनी अनेक कल्पना अगदी नव्या घातलेल्या आढळतात. त्यांची उदाहरणे शोधक वाचकांस त्यांत मुबलक सांपडतील. अ०८१ गी०८६-९० या पांच आर्यातील प्रेमळ व रसाळ वर्णनास मुळांत आधार अगदीच अल्प आहे. योग्य प्रसंगी वर्णनविस्तार कसा करावा हे या व पुढील उदाहरणांवरून पंतांस चांगले कळत होतें असें ह्मणावें लागते. पंत प्रसंगविशेषीं वर्णनविस्तार किती व कसा करित असत याचे मार्मिक व उत्कृष्ट उदाहरण पाहावयाचे असल्यास ते ८३ अध्यायांत कृष्णस्त्रियांनी द्रौपदीला आपल्या विवाहकथा सांगितल्या आहेत तें होय. मूळांत कालिंदी, भद्रा, जांबवती, मित्रविंदा, भामा, सत्या व ल क्ष्मणा यांच्या विवाहकथा एक एका श्लोकांत आटपल्या असून मोरोपंतांनी त्यांच्या वणनात अनुक्रमें ७, ८, ९, १३, १६ व २९ इतक्या गीती खर्चिल्या आहेत. रुक्मिणीचे विवाहवृत्त मुळांत एकाच श्लोकांत वर्णिले आहे. तें पंतांनी अत्यंत सुरस रीतीने ९२ गीतींत वाणल आहे. पंतांनी प्रसंगविशेषीं 'भारत, मंत्ररामायण' व 'हरिवंश' या ग्रंथांतूनही वर्णनविस्तार केलेला आढळतो. भीष्म. अ० १ गी० ९३-९५ यांतील कृपाचार्योक्तींत वर्णनविस्तार असून हरिवंश अ० ५४ तील त्रिपुरवधकथेतही विस्तारच आहे. के. पृ०१८९-१९.० टाप १० (२)(अ) वर्णनसंक्षेप किंवा विस्तारभीरुत्व-याबद्दल तर पंतांची मोठी ख्याल आहे. महाभारतांतील कित्येक मोठाली आख्यानं प्रसंगविशेषीं त्यांनी थोडक्यांत ह्मणजे एखाद दसया गीतींत आटपून टाकिलेली आढळतात. एवढेच नव्हे तर काही प्रसंगी त्यांनी एका गीतींत आख्यानाचे आख्यान आटपले आहे. क्वचित् प्रसंगी एका गीतींत दोनचार आख्यान उल्लेख करून पंत पुढच्या मार्गास लागले आहेत. विस्तरभीरुत्वाचे उल्लेख पंतांच्या कामा पुष्कळच आढळतात त्यांपैकी काही निवडक उदाहरणे पुढे दिली आहेतः