पान:केकावलि.djvu/322

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-२'तसाचि उरलों कसा...विषक्षीर वी; 'प्रभो शरण...विना पांखरे' ह्या केकांचा अन्व- यार्थ लिहा. (के० ४ पृ० ११-१२; के० ४० पृ० ११०-११२). ३ 'कळी करि सुनिर्मळी परम उग्र दावा नळी' यांतील कथासंदर्भ लिहा. (पृ०५६पहा). ४ 'आर्या' वृत्ताचे लक्षण सांगा. पंतांनी एके जागी 'आर्या आर्यासि रुचे हीच्या ठायीं असे जशी गोडी । आहे इतरां छंदी गोडी परि यापरीस ती थोडी' असा उद्गार काढिला आहे तो तुमच्या मतें कितपत यथार्थ आहे ? (मोरोपंताचें चरित्र परिशिष्ट 'ई' पहा). (१८९१) (यु. एस. एफ.) १ अनुप्रास, उपमा, उत्प्रेक्षा व श्वेष यांची लक्षणे सांगा. (अलंकारांची सूची पहा). २ मोरोपंतांचे संक्षिप्त चरित्र लिहा व त्यांच्या मुख्य ग्रंथांची नांवें सांगा व कोणते थोर पुरुष त्यांचे समकालीन होते त्यांची नांवें सांगा. ('मोरोपंताचें चरित्र' पहा ). ३ दयाब्द वळशील...अनन्यगतिका.. करुणार्णवा...उमोप द्रवा ॥ ह्या कवितेचें वृत्त कोणते? त्यांतील गणरचना स्पष्ट करून दाखवा व जाड्या टाइपांतले सामासिक शब्दांचा विग्रह करा. ('काव्यवृत्त' सदर, व के० २० पृ० ५४-५५ पहा.) ४ 'दयामृतघना अहो...न दासां पडे' या केकेचा अन्वयार्थ द्या.(के०१२१ पृ०२९३-२९३). ५ 'केका' शब्दाचा अर्थ लिहा. (पृ० १). (१८९२) (यु. एस्. एफ.) १ यमक, अन्योक्ति व रूपक यांची लक्षणे सांगा. यमक' व 'अनुप्रास' यांतील भेद काय ? २ केकावलीचे वृत्त व त्याचे लक्षण सांगा. पंतांच्या इतर ग्रंथांत व केकावलीत काय फरक आहे तो सांगा. ३ 'तुझें यशचि तारिते...यशोरसी रंगती'॥ 'कृतांतकटकामलध्वजरा... कापि तो हा गळा' ह्या केकांचा अन्वयाथे लिहा व जाड्या टाइपांतले समास सोडवा. ४ 'घनांबु न पडे मुखीं उघडिल्या विना पांखरें' यांतील संदर्भ लिहा. ५'छंदोभंग' व 'यतिविच्छेद' ह्मणजे काय ? छंदोभंगाची दोन उदाहरणे लिहा. ( १८९३) ( यु. एस. एफ.) मोरोपंताचें चरित्र थोडक्यांत लिहा व त्याच्या ग्रंथांविषयी थोडक्यात माहिती सांगा. ____२'अजांडशतकोटि ज्या उदरिं...स्थळ दिले तदा कां दवा ?' या केकार्धाचा कथासंदर्भ देऊन अर्थ लिहा व जरूर तेथें विशेष स्पष्टीकरणार्थ टीपा लिहा. (के०१७पृ०४९-५०) ३ 'पिता जरि...दयामृतरसाधी...जन्मदेचें फिटे' याचा अर्थ लिहा व जाड टाइपांतील समास सोडवा. (के० ९५ पृ० २२९-२३०). (१८९४) (यु. एस्. एफ.) १ मोरोपंत कवि नव्हता असें जे कित्येक ह्मणतात त्याला अनुकूळ किंवा प्रतिकूळ असें तुमचे काय ह्मणणे आहे ते प्रमाणसहित सांगा. '(पृ० १५७-१६०, ९९-१००, १२९-१३० ). २ 'न निष्ठुर पिता...ओखदें कोण पी?' ह्याचे भाषांतर करा. ३ 'न में प्रिय सदोष...तूं अंबरें' याचा अन्वयार्थ लिहा. (के० ८५ पृ० २१३). ४ 'कळी करि...अविशुद्ध ...दावानळी' याचा कथासंदर्भासहित अर्थ सांगा व जाड्या टाइपांतला समास सोडवा.