पान:केकावलि.djvu/295

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८६ मोरोपंतकृत बुंडे, बुडवि सागरी तेरि, सुकर्णधाराविना; सहाय नसतां स्वयें पैरतटासि ती दोविना; । सहाय भंगवजना तव सुकीर्ति जेव्हां करी, १. प्रास्ताविकः-'भगवद्यशाला साधुजनाचें साह्य पाहिजे' ह्या अर्थाचा आणखी दृष्टांत देऊन कवि मागल्या केकेंतील सत्संगमहिम्याचे समर्थन करितात. अन्वयार्थः-तरि (तारूं, नौका, नाव) सुकर्णधाराविना (उत्तम नावाड्याशिवाय) सागरी (सागरांत, समुद्रांत) बुडे (स्वतः बुडते)[व] बुडवि (दुसऱ्यास बुडविते); सहाय नसतां (त्या नौकेत सुकाण्या मदतनीस नसला तर) ती (नाव) स्वयें (स्वतः, आपण होऊन, आपल्या एकट्याच्या सामर्थ्यावर) परतटासि (पलीकडच्या तीरास) दाविना (दाखवीत नाही, पोंचवीत नाहीं); तव (भगवंताची) सुकीर्ति (कल्याणकारक कीर्ति) जेव्हां भगवजना सहाय करी (भगवद्भक्तांना साह्यकारी करून घेते) तयींच (तेव्हांच) भवोदधितटी (संसारसमुद्राच्या तीराला) जनां (लोकांना) लौकरी (विलंब न लावितां) उतरी (उतरिते). प्रथमचरणार्थः-नाव स्वतः कितीही उत्तम असली तरी तिला चालवावयाला जर उत्तम नावाडी नाही तर ती स्वतः आपण समुद्रात बुडते व नौकेंत बसणाया उतारूंसही बुडविते. भावार्थः-मात्रा अत्युत्तम आहे पण ती योजणारा वैद्य जर कुशल नसेल तर ती व्यर्थ जाऊन प्रयंकीर्तिच) तारित रक्षा करिते तद्वत् नाव कितीही चांगली सुदृढ असलीलाच न नाग्वे (तारवताहीं;) सुकाणूं वळवाच्या गामात कुशल नसेल तर ती स्वतः बुडते व वसणाऱ्या उतारूस. बुडविते. समानार्थक वचनः-ही केका रचित असतांना पंतांच्या डोक्यांत भागवताचा पुढील श्लोक घोळत असावा असे वाटते. त्यांत नरदेहाला सुदृढ नौकेची, भगवंताला अनुकूल वायूची, संसाराला सागराची, व भगवद्भक्त गुरूला कर्णधाराची (नावाड्याची) उपमा दिली आहे:'नृदेहमाद्यं सुलभं सुदुर्लभं प्लवं सुकल्पं गुरुकर्णधारम् । मयानुकूलेन नभस्वतेरितं पुमान्भवाब्धि न तरेत्स आत्महा' ॥ (भाग. ११.२०.१७) अर्थ:-नरदेह हा वास्तविक मिळण्यास फार कठिण परंतु मिळाल्यावर फार सुलभ अशी सुदृढ नौका होय. गुरु हा त्या नौकेचा कर्णधार असून मी (भगवान्) अनुकूल वायु आहे. इतकी सामग्री सिद्ध असतांही जो पुरुष भवाब्धि (संसारसमुद्र) तरून जात नाही तो आत्मघाती समजावा. २. नौका. कोशः-'नाव्यं त्रिलिंग्यं नौतायें स्त्रियां नौस्तरणिस्तरिः' इत्यमरः. ३. उत्तम नाविकावांचून, कुशल नावाड्याच्या साहाय्यावांचून, कोशः-'सांयात्रिकः पोतवणिकर्णधारस्तु नाविकः । नियामकाः पोतवाहाः कूपको गुणवृक्षकः ॥' इत्यमरः ४. दुसऱ्या तीराला, पलिकडल्या तटास. द्वितीयचरणार्थः-नौकेला जर नावाडी सहाय नसला तर ती आपल्या एकट्याच्याच सामर्थ्यावर दुसया तीराला जाऊन पोचत नाही. ५. दावीत, दाखवीत नाहीं; परतट दावीत नाही. ६. भगवद्भक्तांना, साधुजनांस. द्वितीयार्धाचा अर्थः-एकटी भगवत्कीर्तिच लोकांचा सत्वर उद्धार करण्यास समर्थ नाही. तिला संत्सगतीचे साहाय्य मिळाले ह्मणजे मात्र