पान:केकावलि.djvu/288

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. २७९ करण' म्हणतात.] वरील प्रकारच्या ध्यानांनी 'अनाहत' ध्वनि उसळून समाधि लवकर लागते. कुंडलिनीः-नाभीच्या खाली 'कुंडलिनी' नावाची एक सर्पाकार शक्ति साडेतीन वेटाळी घालून बसली आहे. मूलबंधपूर्वक आसन साधलें म्हणजे गुदद्वारांतून जाणारा 'अपान वायु खालून जाण्याचा बंद होऊन गुदस्थानाजवळ असणाऱ्या 'मूलाधार' चक्राजवळून लिंगस्थानाजवळ असणाऱ्या 'स्वाधिष्ठान' चक्राच्या द्वारे जाऊन नाभिस्थानाखाली स्वस्थ झोप घेणाऱ्या 'कुंडलिनी'च्या अंगावर आपटतो. उडियान बंधानें खालचा वायु वर खेचण्यास तसेंच कुंभक करून प्राणवायु नाभीच्या खाली ढकलण्यास आरंभ केला म्हणजे नाभिस्थानी असणाऱ्या मणिपुर चक्राच्या खालीं, व भ्रूमध्यापासून नाभिस्थानापर्यंत गेलेल्या सुषुम्नानाडीच्या द्वाराशी निजलेली कुंडलिनी एकाएकी जागृत होऊन आपले वेटाळे हळुहळू उकलावयास लागून काही काळाने सरळ होते. त्या वेळी सुषुम्नेचे द्वार मोकळे होऊन आजपर्यंत परस्परांशी उभा दावा करणारे पण आतां सख्य झाल्यामुळे एक झालेले प्राण व अपान हे दोघे वायु सुपुम्नेत गेल्यामुळे व इडापिंगलांशी त्यांचा वियोग झाल्यामुळे योग्यास मरणप्राय दुःख होते. 'कुंडलिनी' सीण जागी झाली म्हणजे ती हृदयकमळाखाली असलेला वायु पिऊन अस्थि, शिरा, मांस ह्यांचे सत्व शोषते, नासिकेबाहेर जाणाऱ्या प्राणवायूला अधोगामिनी करिते, अधोगमनी अपानाला ऊर्ध्वगमनी करिते व षट्चक्रांचा भेद करिते. योग्यांनी आपल्या शरीरांत पिंडांत (भ्रूमध्याच्या खालच्या भागांत) सहा चक्रे व ब्रह्मांडांत (भ्रमध्याच्या वरच्या भागांत) सहा चक्रे कल्पिली आहेत. त्रिकुट, श्रीहाट, गोल्हाट, औटपीठ, भ्राफा व ब्रह्मरंध्र ही ब्रह्मांडींची षट्चक्रे, 'मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपुर, अनाहत, विशुद्ध ( ची सहा चक्रं. यांच्याही वर 'सहस्रदल चक्र' आहे. 'मूलाधार'चए हैं चासे ऐड ळ गुदस्थानी असून त्याची देवता गणेश आहे. स्वालियान चक्र पीतवे प्रिय.' ॥ ७४३ ॥ (२)पत्याची देवता ब्रह्मदेव वाचन चारिमानात मणिपुर' चक्र दशदलयुक्त-74 १ नीलवर्ण असून त्याची देवता विष्णु आहे. कुंडलिनी क्षुब्ध झाली म्हणजे ती सरळ होऊन - व सुपुम्नेच्या आंत शिरून आधारस्वाधिष्ठान या चक्रांचा भेद करिते व पुढे ती तशीच 'मणिपुर' चक्र भेदून, नंतर पिंगटवर्णाचे, द्वादशदली, रुद्रदेवतात्मक अशा हृदयस्थानी असलेल्या 'अनाहत' चक्राचा भेद करिते. सीण एवढेच करून न थांबतां कंठस्थानी असलेल्या पोडशदलयुत, धूम्रवर्ण व 'जीव' देवतात्मक अशा विशुद्ध चक्राचा समाचार घेऊन पुढे भ्रमध्याचे ठिकाणी असणाऱ्या विद्युद्वर्ण व द्विदल अशा 'अग्नि'चक्राचाही (याला 'आज्ञा' चक्रही म्हणतात) घोट घेते. दोन्ही भिवयांच्या मध्ये व नासिकेच्या मूळाशी में स्थान आहे त्याला त्रिकुट,' 'शिव'स्थान, किंवा 'केदार,' म्हणतात. याच ठिकाणी इडा, पिंगला व सुषुम्ना या तीन नाड्यांचा संगम किंवा त्रिकुट' झाला आहे. या संगमाला गंगा (इडा), यमुना (पिंगला) व - सरस्वती (सुपुम्ना) यांचा संगम म्हणून त्रिवेणीसंगम म्हणतात. या त्रिवेणीशेजारीच 'अनुहा ता'चा मेघनाद ‘सोहं' शब्दाची गर्जना अखंड करित असतो. 'चैतन्यचक्रवतींची शोभा जगदंबा कुंडलिनी' (सोबतचे 'कुंडलिनीचे' चित्र पहा.) ह्या सहाव्या चक्राच्या स्थानीच आपला पराक्रम गाजवून राहात नाही. तर ती मस्तकाभोंवतीं वळसा घेऊन जेथे मस्तकाचे भोंक पाठीच्या कण्याच्या वरच्या अंगास टेकल्यासारखे होते त्या ब्रह्मरंध्राच्या (ह्यासच काकीमुख, 'क'कारांत. किंवा