पान:केकावलि.djvu/285

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कुंडलिनीचा पश्चिममार्गप्रवास व षट्चक्रभेदन. प्राणापानांची मिळणी । शक्ति चेतवी कुंडलिनी ॥ १ ॥ ती आधारशक्ति अचाट । चढे पश्चिमेचा घांट ।। २ ।। कुंडलिनी चालतां वाट । चुकला आधिव्याधीचा हाट ।। ३ ॥ साधितां उल्हाटशक्ति उलट । उघडलें ब्रह्मरंध्रकपाट ॥ ४ ॥ शरीराकारे ते ओतिली । एकाजनार्दनीं पुतळी. ॥ ५ ॥ धिार है सहस्रदल अथवा पंढरपुर; व गुरु अथवा पांडुरंग. पंढरीस कोणी तरी जारे । विठोबा पहारे ।। ६० ।। औट हातांवर विठोबा उभा। मध्ये सुनीळाची प्रभा । कोटि मदनांचा गाभा । सोहं तो रे ॥१॥ विठोबा उभा ना बैसला । जिकडे तिकडे कोंदाटला । अवघा घनानंद भरियला । ज्याचा तो रे ॥ २ ॥ हाती घेऊनि सद्गुरुचिठ्ठी । उघडुनि अंतरिंची निजपेटी । स्थूळ, सूक्ष्म, कारण पाठी । तूर्या पहारे ॥ ३ ॥ घेउनि तुर्येचा अनुभव । अंत:करण शोधित जावं । मी कोण कोठिल हा आहों । विचारुनि पहारे ॥ ४ ॥ दुर्बुद्धि ते दूर करा । मामि अविद्येचा थारा । तुका ह्मणे देहतंबुरा । हाती घ्यारे ।। ५ ॥