Jump to content

पान:केकावलि.djvu/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२५ ) वारंवार येतो. येथे स्थलसंकोचास्तव अशा थोड्या सरस कल्पनांचा नुसता निर्देश मात्र केला आहे:-आदि. ५-९३,१२,३१;१८.७६; सभा. २-३६; वन. ५-४;६.४६,७-४६; विराट. १.१७५,५.१५;५.६६; उद्योग. १०.१८,१०-७८; भीष्म. ६.४६; मंत्ररामायण युद्धकांड २६५,३९३,४३८,४४६,४७८,६४१,७२१,७३२,७४१-७४३,७६९,७८१,७८३, ७८९-७९०,७९५,७९७,८०८,८३४;उत्तरकांड १६,११३,१५८-१५९,१७७,२१२,४२३. पुष्कळ ठिकाणी पंतांनी एक एक शब्द मोठ्या मार्मिकतेने व खुबीने योजिलेला आढळतो. संस्कृतांत कांहीं सत्कवींच्या काव्यांतून 'पदलालित्य' हा प्रकार आढळतो. पंतांच्या काव्यांत हा प्रकार थोडा बहुत सर्वत्रच आढळतो. तरी त्यांच्या कित्येक स्फुटकाव्यांतून, स्फुट आख्यानांतून व विशेषतः संस्कृत भाषेत रचिलेल्या त्यांच्या स्फुट काव्यांतून हा आल्हादकारक पदलालित्याचा प्रकार प्रमुखत्वाने आढळतो. या संबंधी 'शिवार्याशतक,' 'रामस्तुति,' 'पांडुरंगस्तोत्र तृतीय' इत्यादि प्रकरणे वाचावी. 'मुक्तामाला' व 'कृष्णस्तवराज' यांच्या वाचनाने भाषासौंदर्य व अर्थगांभीर्य हे दोन गुण कळून येतील. कालिदास कवीने रघुवंशांतील ९ व्या सर्गात श्लोकाच्या प्रत्येक चतुर्थ चरणांत ज्याप्रमाणे यमकावृत्ति साधली आहे त्याचप्रमाणे पंतांनीं 'विठ्ठलभक्तस्तुति' या प्रकरणांत प्रकार केला आहे. वर निर्दिष्ट केलेली किंवा इतर दुसरी स्फुट प्रकरणे वाचली असतां 'माधुर्य' हा गुण पंतांच्या काव्यांत आढळून येईल. पंतांनी 'महाराष्ट्रभूमीत अठरापर्वांच्या भारती इक्षुदंडाची लावणी करून रसिकजनांच्या मेजवानीचे अपूर्व व अखंड साहित्य करून ठेविले असल्यामुळे त्यांत तर माधुर्यगुण अत्यंत उत्कर्षानें वर्तत आहे. तसाच प्रकार मंत्रभागवतांत-विशेषतः दशम स्कंधांत आढळतो. युधिष्ठिर व जनार्दन यांची पुण्यचरित्रे वर्णन करितांना मोरोपंतांस प्रेमाचे भरतें येते. यास्तव वरील दोन ग्रंथ माधुर्यादि उत्तम काव्यरसांनी पुष्ट झालेले आढळतात. मराठी व संस्कृत भाषा पंतांच्या अगदी अंकित असत. त्यांनी लिहिलेली चित्रकाव्ये, त्यांतल्या त्यांत मंत्रमय रामायण, मंत्रमय भागवत, व हरिसंबोधनस्तोत्र ही वाचली असता त्यांच्या भाषाप्रभुत्वाची उत्तम साक्ष पटेल. त्यांची रामायणे ही 'कवीच्या वाग्देवतेची केवळ स्वतंत्र लीला आहे. होमरच्या महाकाव्यांतील वीर युद्ध आटपल्यानंतर जसे रंगयुद्धांत परस्पर झगडले व नानात-हेच्या कसरती करून त्यांनी कर्मणूक करून घेतली, किंवा चिताऱ्याने मुख्य चित्र तयार झाल्यावर जशी भोवताली नक्षी व वेलबुट्टी काढण्यांत आपली करामत खर्चावी, त्याप्रमाणेच आमच्या कवीने भारतादि मोठमोठ्या ग्रंथांनी आपल्या जन्मभाषेस अलंकृत करून शेवटी आपल्या उपास्य देवतेच्या प्रीत्यर्थ आपल्या सरखतीचा ओघ जलयंत्रोद्गाराप्रमाणे चित्रविचित्रतेने प्रगट केला आहे.' (नि. मा.) त्यांची रामायणे वाचलीं ह्मणजे पंत भाषानर्तकीला वाटेल तशी नाचवीत असे दिसून येते. काव्यांतील शब्दांचा ध्वनि अर्थाचा प्रतिध्वनि असावा' असें में पाश्चात्य पोप कवीने आपल्या काव्यविवेचन कवितेत हटले आहे तें पंताला संमत होते असे दिसतें (परिशिष्ट ऋ २' पहा). सारांश पंतांची कविता केवळ शब्दचमत्कारमय, रसहीन व दुर्बोध आहे अशी जी काही लोकांची समजूत आहे ती योग्य नाही. संशयरत्नावलि, सन्मणिमाला,