________________
२५२ मोरोपंतकृत स्यांतील सखीजवळ आपल्या नायकाचा वृत्तांत सांगत असतां तो ऐकून 'सुंदरि कांत काय ?' अशा रीतीने शंका घेतलेल्या दुसऱ्या सखीस अनुलक्षून 'कांत नव्हे पैजण' असे सांगून खऱ्या अर्थाचा निषेध केला आहे. (६) कैतवयुक्त अपन्हुति कपटादिपदीं गमे निषेध जरी । कांतासुकटाक्षमिषे निघती हे मदनबाण, भरति उरी. ॥११॥ कपट, मिष, निमित्त, छल, इत्यादि शब्दांनीं वर्णनीयवस्तूचा निषेध केला असतां ती कैतवापन्हुति होते. उदाहरणांत असत्यता वर्णन करणाऱ्या 'मिष' या शब्दावरून हे कांताकटाक्ष नव्हेत, तर मदनाचे वाण आहेत अशा रीतीने निषेध व्यक्त होत आहे" (अलंकारविकाश). यांची उदाहरणे:-(शुद्धापन्हुति) न हे नभोमंडल, वारिराशी । न तारका, फेनचि हा तयासी । न चंद्र, हा वर्तुल शेष झाला । न अंक, तो विष्णु गमे निजेला.' ॥ १ ॥ (हेत्वपन्हुति) 'संताप दे यास्तव चंद्र नोहे । रवी ह्मणावा तरि रात्र आहे । हा सागरांतूनि निघूनि गेला । आकाशमागी वडवाग्नि ठेला.' ॥ २ ॥ (हेतुपर्यस्तापन्हुति) 'लक्ष्मी खरे विष, हलाहल वीष नोहे । लोकांत मात्र उलटी समजूत आहे । की ते पिऊनिहि सुखें शिव जागताहे । विष्णू शिवूनिच हिला भुलि पावताहे.' ॥ ३ ॥ 'न विषं विषमित्याहुब्रह्मस्वं विषमुच्यते । विषमेकाकिनं हन्ति ब्रह्मस्वं तु ससंततिम्' ॥ ३ ॥ याचा अर्थः'विष हे वीष नव्हे तर कर्ज हेच विष होय; विष एकट्याचाच प्राण घेते पण कर्ज मुलाबाळांसुद्धा काढणाऱ्याचा प्राण हरण करितें.' (भ्रांतापन्हुति, कल्पित भ्रांति) 'जटा नोहे, वेणी; गरळ न गळां में तुज दिसे, असे कस्तूरी ही; शिरिं कुसुम आहे, विधु नसे;॥ विभूती हे नोहे, तनुधवलता कांतविरहें; । शिवभ्रांतीने कां छळिसि मज कामा! विफल हे.' ॥ ४ ॥ (छेकापन्हुति) 'सीत्कार शिकवितो मज, अधरी व्रण करुनि पुलक उद्भवितो। नागरिक मिळाला की नोहे, हेमंतवात-सखये तो' (सीत्कार=सूं, सूं, करणे) ॥ ५ ॥ छेकापन्हुतीचे एक सुरेख थोरले उदाहरण रामजोशाचें 'राधासखिसंवादी छेकापन्हुति हे आयका । रसिक हो काय चतुर बायका ॥' हे पद होय. त्यांतील थोडासा मासला:-'वांकडी दिसे परि बहिरंतर निर्मला । ती काय राधिका! नव्हे, इंदुची कळा ॥ किति मंजु वसंती रसाळ जीचा गळा । ती काय राधिका ? नव्हे गड्या ! कोकिला.' ॥ रसज्ञांनी ते सर्व पद रामजोश्याच्या पदसंग्रहांत वाचावें. 'अपन्हुति' अलंकाराची मोरोपंताच्या काव्यांतील थोडी उदाहरणे:-(१) 'पुत्र न ते, अतिदारुण खळ तक्षकसर्प पाक-वणवेच.' (अनुशासन ८.३३), (२) 'सखिहस्ती हस्त न वृष, पांडवहृदयांत सायका मारी। (क्रोधातें भीम गिळी, गरळातें जेंवि काय कामारी)' ॥ (सभापर्व) (३) 'युद्ध न हरिसख मांडी त्या सद्यःस्वर्गहेतुसत्रास.' ॥ (विराट अ० ५. ६६), (४) 'प्रतिरवमिषं शरांनी भरतां, कुंथावयासि नभ लागे.' ॥ (विराट ५.३५), (५) 'वृषसेना रणि ह्मणते नाथा ! तुज न विजयें न गुरुशापें । वधिले कृष्णाक्षोभ अथवा माझ्याचि पूर्वकृतपापें. ॥ (स्त्री० ५.१०), (क) सेंचि नाम दुसरे मायावती हे धरी; । शत्रूच्या सदनीं न पाक, तप ती पत्याप्तिसाठी करी.' ॥ (७) 'शुकपिकसकलकलकलस्वरें करुनि भोवतीच आरडती। विविधपतगनिक भूलता रडती.॥ (कुशलवाख्यान ४.७७), (८) 'सतु न तो, यत्पतिने स्वसुता नेली जशी व एणी। त्या लंकेची श्रीभूदेवीने ओढिली असे वणा.' ॥ (वनपर्व १२.११), (९) ते सत्य सर्प. न विशिख; कर्णहि न, तदीय सदन वारुळ तो; । की माणिक्यसर जयश्रीवरणीं शर गळां नवा