Jump to content

पान:केकावलि.djvu/257

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५० मोरोपंतकृत प्रभो ! तुज जसे, तसें मतिस गेह भासे वन.॥ १०२ रमा सकलजनमनोहरा अशी लक्ष्मी. खुबीदार शब्दयोजनाः-भगवान् विष्णु किंवा कृष्ण हा जगन्मोहिनी लक्ष्मीच्या गळ्यांतला केवळ ताईत होता व त्याच्या शिवाय तिला क्षणभर करमत नसे. तसेंच भगवंतालाही ती फार प्रिय होती. अशी गोष्ट होती तरी भगवान् कृष्णाची प्रीति तिजपेक्षा वृषभानूची सुता राधिका' इजवरच जास्त होती. हे दर्शविण्याकरितां पंतांनी 'रमाहृदयवल्लभा' ह्या समासघटितपदाची योजना केली असे वाटते. मोरोपंतांनी आपल्या 'विठ्ठल विज्ञापने'त एका ठिकाणी पुढीलप्रमाणे ह्मटले आहे:-'व्रजी गमिपं देवा! विरहीं निंदि राधिका । आत्मारामा भक्त्यधीना तुला ती इंदिराधिका.' ॥ [श्लोक २५, मोरोपंत स्फुट भाग १, पृ० १४३]. ३. उपभोग, संतोषीकरण. द्वितीयार्धाचा अर्थः-राधेशीं गांठ पडून तिच्याशी हास्यविनोदादि प्रकार एखादे दिवशी जर न घडला तर सकलैश्वर्यसंपन्न देवा! तुला जसे आपले घर अरण्याप्रमाणे भयाण व उदास वाटत असे तद्वत् सत्पुरुषांस ज्या दिवशी हरिकथा श्रवण करावयास सांपडत नाही, त्या दिवशी त्यांना चैन न पडून आपले घर अरण्याप्रमाणे शून्य भासतें; ह्मणजे त्या दिवशी त्यांना गृहदारादिकांणसून सुख वाटत नाही इतका त्यांना भगवत्कथेचा मोह पडलेला असतो. गूढार्थःप्रमाला हा पुरुषाला' रमा झ० 'आदिमाया' किंवा 'प्रकृति' हिच्या बरोबर क्रीडा करण्यास फार आवडते. कारण प्रकृतिपुरुषांच्या क्रीडेमुळेच ब्रह्मांडाची व्यवस्था चालते. ही 'प्रकृतिपुरुषाची' किंवा रमाविष्णूची क्रीडा जेव्हां थांबते तेव्हां प्रलय होतो. 'प्रकृतिपुरुषांची' परस्परांवर एवढी जरी प्रीति आहे तरी 'पुरुषाला' अर्थात् प्रभूला राधा किंवा 'आत्मस्वरूपावस्था' हिच्या ठिकाणी रममाण होणे विशेष अवडते. समानार्थकः-रुक्मिणी आपले विवाहवृत्त द्रौपदीस सांगतांना ह्मणते:-'ज्या दिवशी हरिचरितश्रवण नसे, त्यांत मज दहा दुखणीं । दुखणी काय नवखणी माडी नलगे, धरा नखेंदु खणी.' ॥ [कृष्णविजय-उत्तरार्ध-अ० ८३ गी० १३] १. अटत असे; (पक्षी) वाटते. कृष्णास वाटत असे, साधूंस वाटते. या कथा आणि राधिका यांचे साम्य वर्णिले आहे ह्मणून उपमालंकार झाला आहे. उदाहरणे 2) 'जागर गरधरखरसा, पावसा, रावसा, स्मरारिसायकसा । पार्थ भजन कामाजि नागनायकसा ॥' (कर्णपर्व). (२) 'मदमत्त मतंगज की मी जैसा करगुरु तसे करी; तँ परिसा कटके सकंप वदली तें' ॥ (द्रोणपर्व). उपमेला काव्यसंपदेचें सर्वस्व, व कविवंशाची माता', असें 'राजशेखरा'ने हटले आहे. अलंकारशिरोरत्नं सर्वस्वं काव्यसंपदाम् । उपमा कविवशस्य मातैवेति मतिर्मम ॥ (राजशेखर) (उपमा अलंकारांतच किंचित् फरक केल्याने इतर अलंकार बनतात. पृ० ५८ पहा. रोड है वन भास' यात अपन्हुात अलकाराची छाया पडली आहे. न्हव प्रत्यक्ष शब्दाने जरी केलेला नाही तरी गेहाच्या ठिकाणी असणा'तिचे सेवन' ते न घडतां त्याचे गृहत्व अपन्हुत होतेच म्हणून हा हेत्वपन्हति अलं. कार होय. 'अपन्हति'अलंकार, आणि त्याच प्रकार यांचे स्पष्टीकरणः-'प्रकृतं यनिविध्यान्यत्स्थाप्यते सात्वपन्हुतिः । श्लेषः स वाक्य एकस्मिन्यत्रानेकार्थता भवेत् ॥ (साहित्यकौमदी)