पान:केकावलि.djvu/246

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. २३९ तुम्ही बहु भेले, मला उमज होय ऐसें कॅथा; कसा रसिक तो? पुन्हा जरि म्हणेल आली कां; । वर्यांनी प्रेमातिशयाच्या भरांत परमेश्वराशी सलगी केलेली त्यांच्या ग्रंथांतून जागोजागी आढळते. अशा प्रकारचा लडिवाळपणा ईश्वरभक्तांचा संबंध पितापुत्रांच्या अथवा मातापुत्रांच्या संबंधाप्रमाणे किंबहुना मित्रमित्रांच्या संबंधाप्रमाणे जेथे समजला जातो अशा देशांत असणे केवळ साहजिक आहे. त्याबद्दल कवींना दोष देणे वाजवी होणार नाही. ४. पर्वताला. द्वितीयचरणार्थः-आपल्या भक्तांवर पर्वतप्राय सुप्रसाद करून फारच थोडे केले असें तूं मानतोस. विचारसादृश्यःपरमेश्वर भक्ताचे अणुमात्र कृत्य पर्वताएवढे करितो, पण आपण त्यावर उपकाराचे पर्वत करून कांहींच केले नाही असे मानतो. अशाच प्रकारचे प्रेमोद्गार ‘कृष्ण विजयां'त भक्त सुदाम्याने कृप्णाविषयी काढले आहेत. 'आपण मेरु समर्पनि मानितसे अणुपरीसही स्वल्प । कल्पतरु स्वजनाचा मत्सख मुनिहृदयनागपतितल्प ॥ [अ० ८१ गी० १०९]. ५. उत्तम कवींची वाणीरूपिणी उपवर कन्या. तृतीयचरणार्थः-व्यासवाल्मीकादि सत्कवींची वाणी तुलाच वरण्यास इच्छिते त्याचे कारण तुमच्या जवळ जे उत्तमगुणरूपी अलंकार आहेत त्यांना पाहून आपणाला ते मिळोव म्हणून तुमच्याशीच लग्न लावण्यास ती इच्छिते. मुग्ध स्त्रियांची अलंकारांवर फार भक्ति असते व ते ज्यांच्याजवळ आहेत अशा पुरुषांकडे त्यांचे मन ओढते हे सुप्रसिद्ध आहे. 'कवि' याचे (१) कवन करणारा व (२) ज्ञाता असे दोन अर्थ होतात. सारांशः-ज्ञाते साधुपुरुष कृतज्ञता, औदार्य, सदयता इत्यादि तुझ्या गुणांना लुब्ध होऊन तुझी स्तुति करतात. पाठभेदः-येथे 'सुकवितावधू' असाही पाठभेद आढळतो. परंतु तो विशेष प्रशस्त नाही. ६. बहुमोल अलंकारांना. ७. कीर्ति. व्यु:-अश्नुते (व्याप्नोति) इति यशः पसरतें (चहूंकडे) ते यश. चतुर्थचरणार्थः-म्हणूनच कविजनांच्या वाणीला मोहित करणारी भगवत्कीर्ति वारंवार वर्णन करूं नका असे कोणता मनुष्य म्हणणार आहे? अर्थात् कोणी म्हणणार नाही. यांत भगवद्गुणांस अलंकारांची उपमा व सुकवीच्या वाणीस वधूची उपमा अभेदरूपाने दिली आहे म्हणून हा रूपक अलंकार झाला. या केकेंतील वर्णन सरस उतरले आहे. - १. प्रास्ताविकः-मागील केकेच्या शेवटीं भगवद्यशवर्णनाविषयीं कवीने आपली नीषा इंगित केली, ती पूर्ण करण्याकरितां प्रार्थित होत्साते प्रथमतः पुढल्या चवदा केकांत ते भगवत्कथेची प्रशंसा करितात.' [य० पां० पृ० ३२४. २. दयालु, सदय, प्रथमचरणार्थः-देवा! तुम्ही फार दयालु आहां यास्तव मला समजेल असें सांगा; तुमचे यश कसें वर्णावे ते मला शिकवा. किंवा, पुन्हा पुन्हा भगवद्यशवर्णन करणे कित्येकांस आवडते तसे पुष्कळांस आवडत नाही म्हणून मी तुम्हांला एक गोष्ट विचारतों ती माझी चांगल्या रीतीने समजूत पडेल अशा रीतीने तुम्ही मला सांगा. ३. समजत. उमज पडणें-होणे समजूत होणे. ४. सांगा. ५. रसज्ञ. द्वितीयचरणार्थः-मी एक वेळ ऐकिली होती तीच कथा फिरून आली असें म्हणून जो मनुष्य भगवत्कथेच्या पन